शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

चहुबाजूने चिखली शहर ‘लॉक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:36 IST

जिल्हा प्रशासनाने २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केल्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच चिखली पोलिस अ‍ॅक्शन मोडवर दिसून आले. पालिका प्रशासनदेखील शहरात ...

जिल्हा प्रशासनाने २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केल्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच चिखली पोलिस अ‍ॅक्शन मोडवर दिसून आले. पालिका प्रशासनदेखील शहरात कुठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी दक्ष असल्याचे दिसून आले. मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या नेतृत्वात पालिकेचे पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले असून प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त आहे. वैद्यकीय कारणांशिवाय शहरात प्रवेश करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. विनाकारण शहरात दाखल होणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून ठोस कारणाशिवाय कोणी रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास त्यावर कारवाईसह दंडुका दाखविल्या जात आहे. वाहतूकदेखील बंद असल्याने सर्व रस्ते ओस पडले आहेत. शहरात केवळ दवाखाने व मेडिकल दुकाने सुरू असून केवळ याच ठिकाणी अगदी तुरळक प्रमाणात नागरिक दिसत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडूनदेखील या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

सर्व मार्ग सील

शहरातील सर्व प्रमुख रस्ते प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स लावून चेकपाॅइंट तयार करण्यात आले असून, या ठिकाणी पालिका, पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे कर्मचारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.