शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

३९ हजार कापूस बियाणे नमुन्यांची तपासणी !

By admin | Updated: January 7, 2016 02:32 IST

वर्षभरात सात हजार बियाणे ठरले अप्रमाणित.

नीलेश शहाकार/बुलडाणा : गत वर्षात राज्यभरात ३९ हजार ७८२ कापूस बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार ४0 नमुने अप्रमाणित ठरविण्यात आले. ही तपासणी कृषी विभागाच्या विविध ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली.पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकरी कापूस बियाणे बाजारातून खरेदी करतात. कोणत्याही पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी संकरित, सुधारित जातींची लागवड करावी लागते, तसेच पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे शुद्ध व दज्रेदार असावे लागते. या मूलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत कापूस बियाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. बरेचदा मागील हंगामातील बियाणे राखून ठेवली जातात. अशा बियाणांची पेरणीपूर्वी तपासणी करणे आवश्यक असते. पुणे, परभणी व नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत यावर्षी ४१ हजार ४७१ कापूस बियाणे नमुने प्राप्त झाले. यापैकी ३९ हजार ७८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. विविध परीक्षणाअंती त्यापैकी ७ हजार ४0 नमुने अप्रमाणित ठरविण्यात आले.२0१५ मध्ये सर्वाधिक बियाणे अप्रमाणितबियाण्यांचा काळाबाजार व दूषित बियाण्यांमुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. गत पाच वर्षांत २0१५ मध्ये सर्वाधिक म्हणजे १७.७0 टक्के कापूस बियाणे नमुने अप्रमाणित ठरविण्यात आले. २0११ मध्ये हे प्रमाण १४.६५ टक्के एवढे होते. २0१२ मध्ये ९.९६ टक्के, २0१३ मध्ये ८.९१ टक्के, तर २0१४ मध्ये १२.८४ टक्के कापूस बियाणे अप्रमाणित ठरविण्यात आले होते.गुणवत्ता तपासणी आवश्यकबी-बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १६६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८६ च्या अंमलबाजावणीकरिता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर आवश्यक ठरवलेली आहे. त्यासाठी संबधित कायद्यांतर्गत प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत. येथे वर्षभर विविध बियाण्यांची तपासणी प्रक्रिया सुरू असते.