शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिखली, मेहकरात ११ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: January 7, 2015 00:26 IST

पोलिसांची संयुक्त कारवाई : चार अटकेत, तीन फरार.

चिखली/ मेहकर : सर्वत्र गुटखा बंदी असतानाही परराज्यातून छुप्या पद्धतीने गुटख्याची तस्करी करून जिल्हय़ात विक्री करणार्‍या गुटखा माफियाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. चिखली शहरातील बाबू लॉज चौकातील एका गोडावूनमधून पोलिसांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी फरार झाला आहे. तर मेहकर येथे केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. चिखली व मेहकर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून, या कारवाईत एकूण सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर असे की, गुप्त माहितीवरून रात्रीची गस्त घालताना चिखली पोलीस पथकाने येथील जिल्हा सहकारी बँकेजवळील चौकात वाहनांची तपासणी केली असता एका मालवाहू टाटा अ‍ेस वाहन क्रमांक एम.एच.२८ अ‍ेबी. २२९४ मध्ये सुमारे १ लाख ३७ हजार रुपयांचा गुटखा मिळून आला होता. याबाबत वाहन चालकाच्या चौकशीमध्ये त्याला हा माल स्थानिक बाबू लॉज चौकातील एका घरामधून मिळाला असून, हा माल चिखली शहरातील एका माजी पालिका पदाधिकार्‍यांच्या भावाचा असल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली. याच दरम्यान मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मा यांनी त्यांच्या हद्दीमध्ये एका वाहनामध्ये मोठय़ा प्रमाणात गुटखा पकडला असल्याची माहिती दिली. सदर गुटखा संबधितांने बाबू लॉज परिसरातील एका घरामधून याच व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली असता ताबडतोब या घरावर छापा घालण्याची प्रक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मा आणि चिखलीचे ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली. यामध्ये सुमारे ४ लाख ३१ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी असलेले शेख अकरम शेख अकबर आणि युनुसखा कदीरखा कुरेशी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चिखली आणि मेहकर पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमध्ये ११ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.