शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, कमी झोपेमुळे रोगप्रतिकारशक्तीही खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:37 IST

किमान आठ तास झोप आवश्यक माणसाला किमान आठ तास झोप घेण्याची आवश्यकता असते. पुरेशी झोप झाल्यास शक्यतो आरोग्याच्या ...

किमान आठ तास झोप आवश्यक

माणसाला किमान आठ तास झोप घेण्याची आवश्यकता असते. पुरेशी झोप झाल्यास शक्यतो आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी येत नाहीत. दिवसभर कार्यालयात किंवा इतर ठिकाणी काम केल्याने मोठ्या प्रमाणात थकवा येतो. हा थकवा घालवण्यासाठी झोपेची भूमीका अतिशय महत्त्वाची असते. पुरेशी झोप झाल्यास कामातही मन लागते आणि एकाग्रता वाढते.

अपुऱ्या झोपेचे तोटे..

१ मधुमेह असलेल्या लोकांना झोप लवकर लागत नाही. पुरेशी झोप न झाल्यामुळे चिडचिड मोठ्या प्रमाणात वाढते.

२ दररोज पाच तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना आठ तास झोप घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

३ झोपेच्या अभावामुळे इन्सुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित होते.

रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराची ढाल

रोगप्रतिकारशक्ती विविध आजारांपासून मानवी शरीराचे संरक्षण करते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्या व्यक्तींना कोणत्याही आजाराची लागण सहजपणे होत नाही. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासूनही यामुळे अनेकांना सरंक्षण मिळाले आहे. कोरोना आजारावर ठोस उपाय नसल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्याचा सल्ला डॉक्टरांच्या वतीने देण्यात येत आहे. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्यांना कोरोनाची लागण झाली नाही.

संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक तर असतेच, शिवाय पुरेशी झोप लागण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामही तेवढाच महत्त्वाचा आहे. फास्टफुडऐवजी पोषक आहार व फळांचे सेवन अधिक प्रमाणात करणे गरजेचे आहे.

आठ तासापेक्षा कमी झोप झाल्यास बद्धकोष्टता, ॲसीडीटी, पोट फुगणे आणि पोटाच्या इतर समस्या जाणवतात. आपण वारंवार आजारी पडत असाल तर हे कमी रोगप्रतिकारशक्तीचे सामान्य लक्षण आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणावही मोठ्या प्रमाणात वाढतो.

-डॉ. पी. आर. उमरकर, जनरल फिजिशियन.

वयोगटानुसार किमान झोपेचे तास

०-३ महिने :१४-१७

४-११ महिने : १२-१५

१-२ वर्षे ११-१४

३-५ वर्षे १०-१३

६-१३ वर्ष : ९-११

१४-१७ : ८-१०

१६-६४ : ७-८

६५ वर्षांपुढील : ७-८