शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

काकस यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By admin | Updated: October 24, 2016 02:39 IST

कॉग्रेस प्रवेशाराष्ट्रवादीला धक्का; राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण.

बुलडाणा, दि. २३- नगरसेवक दत्ता काकस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत २३ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचा हात धरला असून २३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात दिग्गजांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. गेल्या आठवडाभरापासून काकस आणि काँग्रेस यांच्यातील सलगीच्या चर्चा या प्रवेशामुळे खर्‍या ठरल्या आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी सुटलेल्या बुलडाणा नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून दत्ता काकस यांच्या पत्नीच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता या प्रवेशानंतर बळावली असून याच ह्यकमिटमेंटह्णनंतर काकस यांचा काँग्रेस प्रवेश निश्‍चित झाला असल्याचे सूत्रांकडून कळते. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाचा रुमाल देऊन दत्ता काकस यांचा प्रवेश करण्यात आला. बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक यांच्या अनुमतीनंतर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या सहमतीनंतर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच प्रदेश सरचिटणीस अँड. गणेशराव पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, बुलडाणा विधानसभेचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्यामबाबू उमाळकर, प्रदेश सरचिटणीस संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. त्यामुळे काकस यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार की केवळ काही तिकिटांवर त्यांना समाधान मानावे लागेल, हे काही दिवसात कळणार आहे.