शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या!

By admin | Updated: June 23, 2016 23:28 IST

जानेफळ येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्यानंतर संजय रायमुलकर यांच्याकडून ग्रामसेवक व आरोग्य यंत्रणेला सूचना.

जानेफळ (जि. बुलडाणा): पावसाळ्याला सुरुवात होताच, अनेक गावांमध्ये गॅस्ट्रो व साथीचे आजार डोके वर काढतात. यावर उपाय म्हणून घाण व अस्वच्छतेकडे प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंचांनी जातीने लक्ष द्यावे आणि आरोग्य सेवक, डॉक्टर यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी दिल्या.जानेफळ येथे २३ जून रोजी कृउबासच्या हॉलमध्ये आयोजित जानेफळ व देऊळगाव साकर्शा परिसरातील सर्व ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते. यावेळी पं.स. सभापती सागर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सरतापे, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, विस्तार अधिकारी शरद जाधव, पं.स. सदस्य गजानन वडणकर, जानेफळ उपसरपंच डॉ. सतीश कुळकर्णी, बीडीओ रविकांत पवार आदी उपस्थित होते. परिसरात गॅस्ट्रो व साथीच्या रोगांची लागण झाल्याने २१ जून रोजी सागर पाटील यांनी जानेफळ गावाला भेट देऊन पाहणी केली. तसेच गावात त्वरित सफाईचे निर्देश दिले होते. यानंतर बीडीओ पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्याशी संपर्क करून जानेफळ येथे २३ जून रोजी जानेफळ, देऊळगावसाकर्शा परिसरातील सर्व ग्रामसेवक, सरपंच, आरोग्य सेवक तथा वैद्यकीय अधिकारी यांची एक बैठक बोलाविण्याबाबत चर्चा केली होती. यानुसार २३ जून रोजी रोगांवर आळा घालण्यासाठी ही नियोजन बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी बोलताना सभापती पाटील यांनी सर्व ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांनी मुख्यालयीच राहून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सांगितले. बीडीओ पवार यांनीसुद्धा ग्रामसेवक, सरपंच तथा आरोग्यसेवक यांना पावसाळ्यात साथ रोगापासून जनतेच्या बचावासाठी दक्ष राहण्याच्या आणि गावात घाण पसरू न देता स्वच्छतेबाबत सक्ती करण्याच्या सूचना दिल्या.