शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'सी आर्म' मशीन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:20 IST

Buldana District General Hospital News मशीन बंद असल्याने रुग्णांना औरंगाबाद, जालना, अकाेला येथे जावे लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील सी आर्म मशीन गत काही दिवसांपासून बंद आहे. तसेच इतर मशीनही अत्याधुनिक नसल्याने डाॅक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे मशीन बंद असल्याने रुग्णांना औरंगाबाद, जालना, अकाेला येथे जावे लागत आहे. बुलडाणा शहरासह रुग्णांना चांगल्या आराेग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी परिसरातील रुग्ण माेठ्या संख्येने येतात. रुग्णालयातील अनेक मशीन जुन्या काळातीलच आहेत. एकीकडे नवनवीन यंत्रांचा शाेध लागत आहे. अत्याधुनिक यंत्रांचा वापर उपचार करताना करण्यात येत आहे. मात्र, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णाालयात जुन्याच मशीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बहुतांशी मशीन या अद्ययावत करण्याची गरज आहे. दुसरीकडे लाखाे रुपये किंमत असलेली सी आर्म एक्स-रे मशीन काही दिवसांपासून बंद पडली आहे. दहा वर्षांपूर्वी ही मशीन रुग्णालयात आणण्यात आली हाेती. तेव्हापासून आतापर्यंत त्यावरच रुग्णांची तपासणी करण्यात येत हाेती. काही दिवसांपूर्वी त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. ती दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन सी आर्म एक्स-रे मशीन देण्यात यावी, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे. 

शस्त्रक्रियेत हाेताे वापर शस्त्रक्रिया करण्यासाठी सी आर्म एक्स-रे मशीनचा वापर करण्यात येताे. ही मशीन बंद पडल्याने रुग्णांना औरंगाबाद, जालना, अकाेला येथे न्यावे  लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सी आर्म मशीन देण्याची गरज आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल