शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद मुलासाठी बुलडाण्याचे दोघे ठरले देवदुत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 14:26 IST

हॉटेलमालक भगवान आंबोरे, रामभाऊ जाधव व सुरेश मेहरे (रा. डोंगर खंडाळा) यांनी पोस्टरवर पाहून त्याला ‘तू हरवला आहेस का?’ असे विचारले. त्याने होकार दिल्यावर लगेच अमरला थांबवून घेऊन जेवू घातले व वडिलांना फोन लावला.

बुलडाणा : तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेला मुलगा रेल्वेतून हरवला. दरम्यान, वडिलांच्या १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुलडाण्याच्या हॉटेल मालकाच्या मदतीमुळे तो सापडला.अमरनाथ संपत पाटील (वय २३, रा. साजणी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. अमरनाथ हा गतिमंद आहे. प्रत्येकवर्षी दिवाळीनंतर तो वडिलांसोबत बालाजीच्या दर्शनासाठी तिरूपतीला जात असे. यंदाही तो ९ जानेवारीला रेल्वेच्या स्लिपर कोचमधून निघाला असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास तो लघुशंकेसाठी गेला असता, एका प्रवाशाला अनावधानाने धक्का लागला. त्यातून वाद झाल्यावर रेल्वे पोलिसांनी त्याला हाताला धरून जनरल डब्यात नेऊन बसविले. थोड्या वेळाने वडिलांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले, तर मुलगा जाग्यावर नव्हता; त्यामुळे त्यांनी सारे डबे शोधले; परंतु मुलगा सापडला नाही. तिरूपती रेल्वेस्थानकावरून तो बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत होते; त्यामुळे मुलगा तिरूपतीमध्येच आहे, असा विश्वास वडिलांना होता. त्यांनी मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी दाद दिली नाही. कुणाला काही विचारायचे म्हटले, तरी भाषेची अडचण होती; परंतु तरीही वडिलांनी धीर सोडला नाही. स्वत: च त्याच्याविषयीचे पोस्टर तयार करून रिक्षातून जाऊन सगळीकडे चिकटवली. हॉटेल्स, गॅरेजेस, सरकारी दवाखाना, सार्वजनिक उद्यानात त्यांनी त्याचा शोध घेतला. कुणीतरी संपर्क साधला, तर लगेच मुलाकडे जाता यावे; यासाठी त्यांनी तिरूपतीमध्येच ठाण मांडले. शनिवार, २५ जानेवारी रोजी त्यांच्या या धडपडीला यश आले. त्यांचा मुलगा मूळच्या बुलडाण्याच्या असलेल्या कपीलतीर्थम परिसरातील ‘संत सावता माळी भोजनालया’त काहीतरी खायला मिळेल म्हणून तो गेला. हॉटेलमालक भगवान आंबोरे, रामभाऊ जाधव व सुरेश मेहरे (रा. डोंगर खंडाळा) यांनी पोस्टरवर पाहून त्याला ‘तू हरवला आहेस का?’ असे विचारले. त्याने होकार दिल्यावर लगेच अमरला थांबवून घेऊन जेवू घातले व वडिलांना फोन लावला. वडील तिथेच रेल्वेस्टेशनवर होते. त्यांनी पळत जाऊन मुलाला मिठी मारली. त्याला पाहून त्यांच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मुलगा सापडल्यानंतर हे दोघेही बालाजीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर सोमवारी त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMissingबेपत्ता होणं