शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पावसाचा कहर!

By admin | Updated: July 12, 2016 00:22 IST

पावसामुळे झाले जनजीवन विस्कळीत; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली.

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. खामगाव, नांदुरा, व सिंदखेड राजा तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सततच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळी पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंंत पाऊस सुरूच होता. दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या या पावसामुळे सोमवारी अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती, तर काही शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांंनी अघोषित सुटी दिली. संततधार पावसामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामेही बंद होती. रविवार व सोमवारला सकाळी काही भागात, तर दुपारी काही ठिकाणी पावसाचा वेग वाढला होता. जिल्ह्यात नांदुरा व खामगाव व सिंदखेड तालुक्यात अतवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची नोंद करण्यात आली. यात बुलडाणा तालुक्यात ५८ मिमी, चिखली ३२ मिमी, देऊळगाव राजा ४७ मिमी, मेहकर ४0 मिमी, लोणार ४३ मिमी, सिंदखेड राजा ६६ मिमी, मलकापूर ४१ मिमी, मोताळा ५७ मिमी, नांदुरा ७२ मिमी, खामगाव ६७ मिमी, शेगाव ६२ मिमी, जळगाव जामोद ५४ मिमी आणि संग्रामपूर तालुक्यात ६३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाची सरासरी २0.१ मि.मी आहे. दिवसभर पाऊस झाल्याने सर्वच तालुक्यात पावसाची आकडेवारी वाढणार आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. त्याची सरासरी १६२.२ मि.मी. आहे. पावसाची नोंद करण्यात आली. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६९६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी ५३.५ मि.मी आहे. आतापर्यंंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंंत पडलेल्या पावसाची सरासरी २४0.८ मि.मी आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळीही वाढत आहे. नळगंगा प्रकल्पात ४.३९ टक्के जलसाठा असून, पेनटाकळी - ३.९१ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात मृत जलसाठा असून, मध्यम प्रकल्प असलेले पलढग - ३.६0 टक्के, ज्ञानगंगा - १६.३१ टक्के, मस - ८.२ टक्के, कोराडी - १.७८ टक्के, मन - १२.६६ टक्के, तोरणा - ४.७२ टक्के, उतावळी - ८.४0 टक्के जलसाठा आहे.बाजारपेठ ठप्प रविवार व सोमवारी दिवसभर पाऊस असल्यामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठ ठप्प होती. नागरिक केवळ काही कामानिमित्तच बाहेर निघाले. सोमवारी दिवसभर बुलडाणा, खामगाव, लोणार, शेगाव येथील बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ग्राहकच नसल्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.