शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट चार टक्क्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 11:41 IST

Buldhana Corona News जिल्ह्यात गेल्या चार दिवसात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण सातत्याने वाढत असतााच ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही पाच दिवसात दुपटीने वाढली असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही (रिकव्हरी रेट) चार टक्क्यांनी घसरलेले आहे. गेल्या पाच दिवसात सक्रीय रूग्णांची संख्या ५२३ वरून १ हजार ५२ वर पाेहाेचली आहे.  तीन दिवसापूर्वी दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३१ टक्के होता नंतर २२ टक्के होवून आज १६ टक्क्यावर पोहोचल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधीतांचे प्रमाणही त्यात वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. परिणामी आता सुपरस्प्रेडरचा शोध घेवून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर आरोग्य यंत्रणा भर देत आहे. त्यानुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सापडलेल्या ५६ हजार १०० दुर्धर आजार असणाऱ्यांपैकी आतापर्यंत ५,३८८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त दुर्धर आजार असणाऱ्यांपैकी आणखी काही संदिग्धांच्या चाचण्या करण्यास आराेग्य यंत्रणेने पावले उचललेली आहेत. त्यासदंर्भाने पालिकांनाही पथके नियुक्त करून सुपर स्प्रेडरसह बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांपैकी कोणी संदिग्ध असल्यास त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत केले जावे असे सुचीत केल्या गेले आहे. परिणामी पालिकांसह ग्रामीण भागातही यंत्रणा आता सक्रीय झाली आहे. तहसिलदारांनाही निर्देश दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे डिसेंबर २०२० मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जवळपास ९६ टक्क्यांवर होते ते आता ९२ टक्क्यावर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सक्रीय रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात ५२३ कोरोनाचे ॲक्टीव्ह रुग्ण होते त्यांची संख्या १९ फेब्रुवारी रोजी १०५२ झाली आहे. म्हणजे गेल्या पाच दिवसाचा विचार करता ५१ टक्क्यांनी कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहे.

चार दिवसात सहा जणांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या चार दिवसात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये बुलडाणा शहर परिसरातील दोन, चिखली तालुक्यातील दोन, मलकापूर येथील एक व मेहकर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. नाही म्हणायला बुलडाणा जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.१७ टक्के असून तो नियंत्रणात आहे. पण चार दिवसात सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात आज पर्यंत कोरोनामुळे १८३ जणांचा मृत्यू झालेला आहे.

 जिल्ह्यात कोरोनाचा संसगर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तसेच रॅपीट टेस्टही वाढविण्यात आल्या आहेत. - डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा