शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By admin | Updated: August 22, 2014 23:34 IST

शिवसेनेच्या मोर्चात शेतकर्‍यांना एकरी ५0 हजार रूपये आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.

बुलडाणा : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, वगळलेल्या बुलडाणा तालुक्याचा टंचाई घोषित तालुक्यामध्ये समावेश करावा आदी मागण्यांसाठी आज शिवसेनेचा मोर्चा खासदार प्रतापराव जाधव, आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिजामाता क्रीडा संकुलमधून हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारलाईन, कारंजा चौकातून स्टेट बँक चौक, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव, आ.विजयराज शिंदे, आ.संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, धीरज लिंगाडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख अमरदीप देशमुख, राजेश देशमाने यांनी मागण्यांचे निवेदन सादर करून जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. जिल्हाभरामध्ये पेरणीयोग्य पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे अत्यल्प पावसावरच उशिराने पेरण्या कराव्या लागल्या. त्यातच सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने अप्रमाणित बियाण्यांची पेरणी शेतकर्‍यांना करावी लागली. त्यामुळे बियाणे उगवले नसल्याने पेरण्या उलटल्या. त्यामुळे शेतकर्‍यांचा यावर्षीचा खरीप हंगाम १00 टक्के हातातून गेला; दरम्यान पाऊस गायब झाल्याने संपूर्ण पिके सुकून गेली. राज्य शासनानेसुद्धा जिल्ह्यामध्ये टंचाई घोषित केलेली असल्याने व खरीप हंगाम हातातून गेल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना एकरी ५0 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. वगळलेल्या बुलडाणा तालुक्याचा टंचाई घोषित तालुक्यामध्ये समावेश करावा.यावेळी मोर्चात उपजिल्हा प्रमुख शांताराम जगताप, डॉ.प्रतापसिंग राजपूत, शशिकांत खेडेकर, दिलीपबाबू देशमुख, वसंतराव भोजने, अविनाश दळवी, तालुकाप्रमुख अर्जुन दांडगेसह अन्य आंदोलक उपस्थित होते.