देवधाबा : येथील भारत संचार निगम लि. कं.ची मोबाईल सेवा गेल्या महिनाभरापासून बंद आहे. टॉवरला कनेक्टीव्हिटी देणारा इलेक्ट्रॉनिक्स पार्ट निकामी झाला असल्याने सेवा खोळंबली असून देवधाबा व परिसरातील मोबाईलधारक हे त्रस्त झाले असून सदरचा दोष त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.बीएसएनएल कंपनीचा देवधाबा येथे मोबाईल टॉवर उभा राहिल्यापासून दिवसेंदिवस सुविधा मिळत असल्याने ग्राहकांनी इतर मोबाईल कंपनीचे सीम बंद करुन बीएसएनएलची सीम घेऊन दूरसंचाराचा वापर सुरु केला. मात्र गत महिन्यापासून येथील मोबाईल सेवा पुरविणार्या यंत्रणेमधील मेडीया नावाचा टॉवर ते टॉवर कनेक्टीव्हिटी देणारा पार्ट हा निकामी झाल्यामुळे येथील कनेक्टीव्हिटी ही एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही दुरुस्त न झाल्याने येथील नागरिक हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याची आठवण बीएसएनएलच्या ग्राहकांना होत असल्याने सदर काम हे तत्परतेने व्हावे, अशी अपेक्षा आहे.
बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प
By admin | Updated: July 26, 2014 22:55 IST