शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

बुलडाणा : कोरोनाकाळात बहुतांश जणांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू झाले. काहींचे अजूनही सुरू आहे. मात्र, अशा विविध कारणांनी त्यांची ...

बुलडाणा : कोरोनाकाळात बहुतांश जणांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू झाले. काहींचे अजूनही सुरू आहे. मात्र, अशा विविध कारणांनी त्यांची चालण्याची सवय मोडली आहे. परिणामी, नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी सुरू झाल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.

बुलडाणा शहर छोटे असले तरीही याचा विस्तार वाढू लागला आहे. राहायला घर मिळाले तरी मूलभूत गरजांसाठी शहरात यावे लागत असल्याने घरात अतिरिक्त गाडीची गरज भासत आहे. ही गाडी ताब्यात मिळाल्यानंतर पायी चालण्याचे प्रमाण कमी होत असून, घर ते ऑफिसचे अंतरही गाडीवरून कापले जात आहे. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी जवळच जायचे असल्यास दुचाकीचा वापर केला जात आहे.

या कारणांसाठीच होतेय चालणे

ज्येष्ठ-व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ

महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षामिळेपर्यंत

पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली

तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत

हे करून पाहा

एक किमी परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा

कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा

म्हणून वाढले हाडांचे आजार

हाडांचे आजार सध्या विविध कारणांमुळे अनेकांची चालायची सवय मोडली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. मैदानी खेळ, धावणे, चालणे बंद आहे. खानपानातही बदल झाला आहे. शरीराला कुठलाही व्यायाम नसल्याने हाडांचे आजार बळावत आहेत.

ज्यांना चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी चालण्याचा व्यायाम योग्य पद्धतीने केल्यास आरोग्याला कित्येक लाभ मिळतात; परंतु, अनेकांना पायी चालणे शक्य होत नाही. त्यांनी बसल्या ठिकाणी योगासने, प्राणायाम करणे गरजेचे आहे़ त्यामुळे अनेक स्नायूंची होणारी दुखापत टाळता येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.