शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:35 IST

बुलडाणा : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त ...

बुलडाणा : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला याेजनेेअंतर्गंत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यात गॅसचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच 'बजेट" कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र सिलिंडरच्या दरात हाेत असलेली वाढ लाभार्थींसाठी डोकेदुखी ठरत आहे.

गरिबांच्या आवाक्याबाहेर सिलिंडरचे दर

उज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसिडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसिडी मिळत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते.

जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहचले, त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१मध्ये सिलिंडरचे दर ७८९. ५० रुपयांवर पोहचले आहेत.

उज्ज्वला याेजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने खूप आनंद आला होता. मात्र, सिलिंडर महाग झाल्याने आता तोंडचे पाणी पळाले आहे. महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यासारख्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवरील सबसिडी वाढवण्याची गरज आहे.

- भारती बाहेकर, किन्हाेळा

गत काही महिन्यांपासून महागाई माेठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढत असताना गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. दरररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागविताना नाकीनऊ येत आहेत. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

-सारिका महाकाळ

आपल्याला गॅस मिळाला, याचा मोठा आनंद झाला, काही दिवस त्याचा वापर केला. मात्र वर्षभरापासून सिलिंडरचे वाढते दर न परवडणारे आहेत. सिलिंडर भरणे परवडत नसून ते न वापरलेलेच बरे, या विचाराने गॅस वापरणे बंद केले आहे. काेराेनामुळे आधीच सहा महिने लाॅकडाऊन हाेते. त्यातच शेतीचा हंगामही संपला आहे. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात असताना गॅसचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. - वैष्णवी जाधव, बुलडाणा

दररोज मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह केला जातो. मात्र आता महागाई आवाक्याबाहेर जात असताना गॅस सिलिंडरचेही दर वाढल्याने त्याचा वापर न केलेलाच बरा, असे सर्वांनाच वाटत आहे. ग्रामीण भागात सरपण मिळते. त्यामुळे गॅसचा वापर कमी करून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. दर कमी करण्याची गरज आहे.

-अश्विनी मिसाळ, बुलडाणा

मध्यंतरी सिलिंडरचे दर कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला होता. त्यामुळे आता मिळालेल्या गॅसचा आपल्यालाही वापर करता येईल, याचा आनंद झाला होता. मात्र गॅस सिलिंडरचे वाढते दर पाहता सिलिंडर वापरणे शक्य होत नाही. जवळपास ८०० रुपयांवर गॅसचे दर गेले आहेत. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागणार आहे.

-रेखा सुसर, शिरपूर