शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांची लाच घेताना दोघांना अटक

By admin | Updated: December 24, 2015 02:41 IST

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना.

बुलडाणा : परिचारिकेचे वेतन व भत्ते काढण्यासाठी तिच्याकडून पाच हजारांची लाच घेताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकासह एका शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ डिसेंबर रोजी रंगेहात पकडून अटक केली. या कारवाईमुळे सामान्य रुग्णालयात खळबळ उडाली आहे. माधवराव पडतुजी जायभाये (रा. सोयगाव ता. बुलडाणा) यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक तेजस अनिल डहाळे (२४) याने जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका असलेल्या त्यांच्या मुलीचे वेतन व भत्ते काढण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. तुम्ही पाच हजार रुपये दिले नाहीत, तर यानंतर तुमचे मुलीचे कोणतेही वेतन व भत्त्याचे बिल काढणार नाही, असेही त्याने माधवराव जायभाये यांना धमकावले. दरम्यान, पाच हजार रुपये देण्यासाठी सामान्य रुग्णालयातील रुचिरा टी-सेंटर येथे भेटण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी लाचेची मागणी तेजस डहाळे व त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र शिपाई गजानन लक्ष्मण गिर्‍हे यांनी पडताळणी पंचनाम्यादरम्यान केली. शिपाई गिर्‍हे याने दोन हजार रुपये तेजसच्या सांगण्यावरून स्वीकारले, तर उर्वरित तीन हजार रुपये तेजस डहाळे याने पंचांसमक्ष स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडून त्यांनी स्वीकारलेले पाच हजार रुपये रोख पंचांसमक्ष हस्तगत केले. यातील आरोपींनी आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना बेकायदेशीररीत्या लाच स्वीकारण्यास मदत केली व प्रोत्साहन दिले. यावरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध कलम ७, १२, १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.