शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कीटकनाशक जप्त

By admin | Updated: October 28, 2016 02:39 IST

बोगस कीटकनाशकाच्या बाटल्या कृषी विभागाने गुरुवारी दुपारी जप्त केल्या.

लोणार, दि. २७- सोयाबीन, तूर हरभरा यासारख्या पिकांवर किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी वा परण्यात येणार्‍या बोगस कीटकनाशकाच्या ६0 हजार रुपये किमतीच्या बाटल्या कृषी विभागाने गुरुवारी दुपारी जप्त केल्या. पिकांवर पडणार्‍या वेगवेगळय़ा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी पिकांवर मोठय़ा प्रमाणात फवारण्यात येणार्‍या डयुपॉट कंपनीच्या कोराजन या कीटकनाशकाच्या १५0 आणि ३0 मिलीच्या १00 बोगस बाटल्या तळणी येथील प्रसाद कृषी केंद्राचे संचालक गजानन विष्णू सरकटे यांच्या बोलेरो गाडीतून संशयास्पदरीत्या आढळून आल्या. त्यामुळे समाधान राजगुरु यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाने कारवाई केली. तळणी ता.मंठा जि. जालना येथील प्रसाद कृषी केंद्राचे संचालक गजानन विष्णू सरकटे हे २ वाजताच्या दरम्यान आपल्या एम.एच.२४ व्ही ४२७७ बोलेरो गाडीतून किराणा सामान खरेदी करण्यासाठी आले असता सरकटे यांनी आपली गाडी लोणी रोडवरील बनमेरु यांच्या किराणा दुकानासमोर उभी करत असताना त्यांच्या गाडीतील बॉक्समधून डयुपॉट कंपनीचे कोराजन कीटकनाशकाच्या काही बाटल्या खाली पडल्या. या बाटल्या येथील डयुपॉट कोराजन कीटकनाशकाचे अधिकृत विक्रेता समाधान राजगुरु यांच्या दृष्टीस पडल्या. हे कीटकनाशक बोगस असल्याचा संशय समाधान राजगुरु यांना आला. त्यांनी याबाबत पं.स.चे कृषी अधिकारी पथाडे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पाहणी केली असता कीटकनाशक बोगस असल्याचे आढळून आले. यावेळी पथाडे यांना सरकटे यांनी आपल्या तळणी येथील प्रतिष्ठानचे नाव जमुनागीर बाबा कृषी केंद्र असल्याचे सांगितले. तसेच हे बोगस डयुपॉट कोराजन कीटकनाशक औरंगाबाद येथील नवा मोंढा स्थित कल्पेश कृषी केंद्रावरून खरेदी केल्याचे सांगितले. सदर कृषी केंद्राबाबत औरंगाबाद याठिकाणी चौकशी केली असता नवा मोंढय़ात कल्पेश कृषी केंद्र नावाचे दुकानच नसल्याचे समजले. दुपारी २ वाजता घडलेल्या या घटनेमध्ये सायंकाळी ७ वाजता कारवाई करण्यात आली. त्यांनी पंचनाम्यात गजानन सरकटे यांच्या प्रतिष्ठानाचे नाव प्रसाद कृषी केंद्र दा खविले, तर ज्या दुकानावरून बोगस कीटकनाशक खरेदी केले, ते दुकान औरंगाबादऐवजी जालना येथील दाखविले. कृषिमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीया प्रकाराची माहिती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना भ्रमणध्वनीवरून दिली असता कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सदर बोगस कीटकनाशकाच्या बाटल्या गाडीसह ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे निर्देश कृषी अधिकार्‍यास दिले. मात्र, कृषी अधिकारी पथाडे यांनी कृषिमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कारवाई करण्यास विलंब केला. तसेच पंचनाम्यात फेरफार केला.