शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र!

By admin | Updated: December 7, 2015 02:48 IST

पश्‍चिम विदर्भात खामगाव नगरपालिकेत प्रयोग; बनावट स्वाक्षरीला पायबंद.

खामगाव (जि. बुलडाणा): डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याचा मान पश्‍चिम विदर्भात खामगावच्या नगरपालिकेला मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य ११ पालिकांमध्येही यासंदर्भातील डाटा संगणकीकृत करण्यात येत असून, लवकरच तेथेही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने उपसंचालक, आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक, जन्म व मृत्यू (महाराष्ट्र राज्य) यांच्याशी ३0 जून २0१५ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांशी संबंधित आवश्यक संसाधनांची जुळवाजुळव करून नगरपालिका प्रशासनाने ३ डिसेंबरपासून अद्ययावत दाखले देण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे दाखले देणारी पश्‍चिम विदर्भातील खामगाव नगरपालिका पहिली ठरली आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांसोबतच बांधकाम परवानगी आणि तत्सम कागदपत्रेदेखील डिजिटल स्वाक्षरीने देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. दाखले तात्काळ मिळण्याच्या सोयीमुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.डिजिटल स्वाक्षरीची विश्‍वासार्हता वाढविण्यासाठी शासनाने जन्म-मृत्यू अधिनियमासोबतच आयटी अँक्टच्या कलम ४ अन्वये या प्रमाणपत्रास अधिक सुरक्षा प्रदान केली आहे. अमरावती महापालिकेनंतर पश्‍चिम विदर्भात खामगाव पालिकेने अद्ययावत तंत्रज्ञानाने दाखले देण्यास प्रारंभ केला असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डी.ई. नामवाड यांनी स्पष्ट केले.