शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांनो सावधान..! दिवसाला ४०० बसेसची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

बुलडाणा : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात एसटी महामंडळ अलर्ट झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली ...

बुलडाणा : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात एसटी महामंडळ अलर्ट झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. एसटी महामंडळाच्या पथकाकडून दिवसाला ४०० बसेसची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.

कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोना संसर्ग ओसरल्याने बसेस पूर्ववत झाल्या आहेत. लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातही बहुतांश बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. परंतु आजही काही फुकटे प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अंकुश बसविण्यासाठी एसटी महामंडळाने लक्ष्य केंद्रित केले आहे. एसटी महामंडळाची पथके जिल्हाभर तैनात करण्यात आली असून, कुठेही बसची तपासणी करण्यात येईल. २२ सप्टेंबरपासून बसेसची अशी तपासणी करण्यात येत आहे.

कुठेही, केव्हाही होऊ शकते तपासणी

जिल्ह्यात कुठेही आणि केव्हाही बसेसची तपासणी होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करताना आपले तिकीट प्रवास होईपर्यंत जपून ठेवणे आवश्यक झाले आहे. २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.

या कायद्यानुसार अशी हाेते कारवाई

मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सध्या एसटी महामंडळाच्या पथकांकडून जिल्ह्यातील बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवाशांवर दंड करण्याची मोहीम सुरू झालेली आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येत आहे.

तपासणी अधिकारी यांना बस तपासणीच्या वेळी प्रवाशांनी प्रवास केलेल्या मार्गाचे तिकीट दाखविणे आवश्यक आहे.

अशी आहेत पथके

०७

आगारनिहाय

०५

विभाग नियंत्रक

एकूण पथके - १२

तपासणी अधिकारी - २४

प्रवाशांसह वाहकांचीही खबरदारी...

एसटी बसने विनातिकीट प्रवास करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने प्रवास करताना सुरुवातीला आपले तिकीट घेणे आवश्यक आहे. ते पूर्ण प्रवास होईपर्यंत स्वत:जवळ सुरक्षित ठेवावे. प्रवाशांसह वाहकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या बसमध्ये किती प्रवासी आहेत, किती प्रवाशांनी तिकीट काढले हे तपासणी करणे आवश्यक आहे.

- ए. यू. कच्छवे, वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.