शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सावधान डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय! बुलडाण्याची स्थिती अजून बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

बुलडाणा : काही राज्यात कोरोना व्हायरसप्रमाणे डेंग्यूचा व्हायरसही आपले रूप बदलत आहे. सुदैवाने बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्याही आटोक्यातच असून, त्याच्या ...

बुलडाणा : काही राज्यात कोरोना व्हायरसप्रमाणे डेंग्यूचा व्हायरसही आपले रूप बदलत आहे. सुदैवाने बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्याही आटोक्यातच असून, त्याच्या विषाणूचे व्हायरसही बदललेले नाहीत. चालू वर्षी जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत केवळ सात रुग्ण सापडले आहेत.

जिल्हाभरातून २०२१ मध्ये डेंग्यूच्या संशयित ६६ रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी केवळ सात डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण चिखली तालुक्यातील अमडापूर या एकाच गावातील आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये डेंग्यूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. देशात डेंग्यूचे प्रमाण जास्त असूनही जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, ही एक समाधानाची बाब आहे. यासोबतच जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या जनजागृतीचाही हा सकारात्मक परिणाम म्हणता येईल.

हे बदल काळी वाढविणारे

ताप नसताना पॉझिटिव्ह

ताप नसताना डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात कुठेही सापडलेले नाहीत. जिल्ह्यात डेंग्यूविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. यावर्षी आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या संशयित नमुन्यांपैकी केवळ चिखली तालुक्यातील अमडापूर येथे डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

पॅथालॉजिस्ट म्हणतात

कोरोनासारखाच डेंग्यू व्हायरसही बदलत आहे. ज्या रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणे नाहीत, त्यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह व ताप नसलेल्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, अशी स्थिती अनेक राज्यात आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात अशाप्रकारे डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्त नमुन्यांमध्ये सापडलेले नाही, असे येथील पॅथालॉजिस्टचे म्हणणे आहे.

..................प्रतिक्रिया...............

व्हायरस बदलाबाबत जिल्हास्तरावर सांगता येत नाही

डेंग्यूच्या विषाणूमधील बदल हा विषय राज्यस्तरावरील आहे. यामध्ये राष्ट्रीय विषाणू संस्था (पुणे, एनआयव्ही) संशोधन करीत असतात. जिल्हास्तरावर हे सांगता येत नाही की, विषाणूमध्ये बदल होतोय किंवा नाही. तसेच ऑफिशियल व अधिकृतरीत्या यावर कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही किंवा चर्चासुद्धा झालेली नाही.

- शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.

..................बॉक्स.................

जिल्ह्यातील डेंग्यूचे रुग्ण

जानेवारी ते ऑगस्ट २०२१ : ०७

१ ते २२ सप्टेंबर ००

शुक्रवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने : ००

..................बॉक्स................

जिल्ह्यातील डेंग्यूच्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या

तालुके रुग्ण

बुलडाणा ००

चिखली ०७

मेहकर ००

लोणार ००

सिंदखेड राजा ००

देऊळगाव राजा ००

मोताळा ००

खामगाव ००

शेगाव ००

मलकापूर ००

नांदुरा ००

जळगाव जामोद ००

संग्रामपूर ००