शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहा-राजरत्न आंबेडकर

By admin | Updated: October 24, 2016 02:38 IST

बुलडाणा येथे भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम संपन्न झाला.

बुलडाणा, दि. २३- भारताच्या राजकारणात अनेक पक्ष आहेत. बाबासाहेबांच्या जीवनकाळात महात्मा गांधींच्या दबावामुळे पुणे करार करावा लागला. आज घडीला तीच परिस्थिती देशातल्या बौद्ध बांधवांवर लादण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र बौद्ध बांधवांनी कुठल्या पक्षात राहावे त्याला आमचा विरोध नाही; मात्र त्यांनी डॉ. बाबासाहेब यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे पाईक होऊन बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहावे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले. स्थानिक गांधीभवन येथील आयोजित भारतीय बौद्ध महासभेतर्फे २२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता राजरत्न आंबेडकर उपस्थित जनसमूदायाला संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोकराव आंबेडकर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक प्रा. प्रकाश गवई, आनंद वानखेडे, दिलीपराव जाधव, विश्‍वनाथ दांडगे यांच्यासह बौद्ध विचारांच्या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रास् ताविकात आनंद वानखेडे यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. त्यानंतर प्रा. प्रकाश गवई यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जातीव्यवस्था निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, एसटी, एससी, ओबीसी प्रवर्गाच्या अनुशेष भरती करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, असे सांगितले. राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेनुसार दलित या शब्दाचा उल्लेखच नाही; मात्र इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया भारतातल्या मागासवर्गीय जनतेवरील अत्याचाराविरोधात दलित हा शब्दप्रयोग करतात; मात्र दलित हा शब्द घटनाबाह्य आहे. यामागील कारण आंतरराष्ट्रीयदृष्ट्या चुकीचे असून दलितांवरील अत्याचाराच्या बातम्या ह्या बौद्धांवरील अन्याय-अत्याचार या हेडिंगखाली घेणे आवश्यक आहे; मात्र प्रसारमाध्यमे असा शब्दप्रयोग करीत नाही. भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशात गेल्यावर मी बौद्ध राष्ट्राचा प्रतिनिधी आहे, असे दाखवून करोडो रुपये त्या देशांमधून भारतात आणतात व बुलेट ट्रेनची मागणी करतात. वास् तविक पाहता भारतातील मीडिया इथल्या दलित अत्याचारांवर दलित म्हणून प्रकाशझोत टाकतो. कारण बौद्ध राष्ट्र हा उल्लेख झाल्यास यांना करोडो रुपयांचा निधी मिळणे दुरा पास्त होते. त्यामुळे इथल्या दलित बांधवांनी स्वत:ची ओळख बौद्ध म्हणून करावी, असेही त्यांनी सांगितले. यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पाईक होऊन बौद्ध महासभेची नोंदणी करून घेऊन समाजाशी एकनिष्ठ आहोत, याचा प्रत्यय द्यावा. बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच बाबासाहेबांचे भारताला बौद्धमय राष्ट्र करण्याचे स्वप्न साकार होईल. त्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधवांची उपस्थिती होती.