शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

रॉकेलसाठी लागणार ‘आधार’!

By admin | Updated: October 25, 2016 02:54 IST

मोताळा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना आता आधार व मोबाइल क्रमांक बंधनकारक.

मोताळा, दि. २४- तालुक्यातील अनुदानित केरोसिनकरिता पात्र असलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांना आता आधार व मोबाइल क्रमांक बंधनकारक केले आहे. रॉकेल मिळविण्यासाठी संबंधितांकडे ३0 ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्याने आधार कार्डची सत्यप्रत व आपला मोबाइल क्रमांक द्यावयाचा आहे. ३0 ऑक्टोबरपर्यंत आधार कार्ड लिंक न झाल्यास १ नोव्हेंबरपासून त्यांचा केरोसिन पुरवठा बंद केला जाणार आहे.केंद्र शासनाने एलपीजी व केरोसिन लाभार्थ्यांंचे आधार क्रमांक संकलित करण्याचे व निर्धारित कालर्मयादेत आधार क्रमांक सादर न करणार्‍या लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ न देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अनुदानित केरोसिन मिळण्यास पात्र लाभार्थ्यांंचे आधार क्रमांक संकलित करण्याचा निर्णय घेतला असून, अनुदानित केरोसिन पात्र लाभार्थ्यांंना ३0 ऑक्टोबरपर्यंंत संबंधितांकडे आधार व मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. केरोसिन वितरणातील काळा बाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांना आधारकार्ड, मोबाइल क्रमांक बंधनकारक केले आहे. तहसील स्तरावर आधार कार्ड लिंक करावयाचे असून, त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. कार्डधारकांना कमी रॉकेल दिल्यानंतर उरलेला साठा ज्यादा दराने बेकायदेशीर विकत असल्याचा गोरखधंदा व रॉकेल वितरणातील काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाहनांसाठी केरोसिनचा वापर, पेट्रोल पंपावर रॉकेलची भेसळ, एकाच शिधापत्रिकाधारकांची अनेक ठिकाणी नावे नोंदवून केरोसिनचा काळाबाजार आदींबाबत तक्रारींचा ओघ पाहता, शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात आल्या; मात्र पायबंद बसत नसल्यामुळे या योजनेचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार केरोसिन घेत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांंचे मोबाइल क्रमांक घेऊन आधार क्रमांक लिंकींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात १२५ परवानाधारक केरोसिन विक्रेते असून, तालुक्यासाठी ७२ केएल रॉकेलचा कोटा देण्यात येतो.