शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जफेडीसाठी बँकांचा तगादा!

By admin | Updated: May 4, 2015 01:16 IST

कोट्यवधीचे सोने बँकांकडे गहाण; बँकांकडून वसुलीसाठी नोटीस, शेतकरी चिंतातुर.

अनिल गवई/ खामगाव : सुवर्ण तारण योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपयांचे सोने बँकांकडे ह्यगहानह्ण ठेवले आहे. बँकांच्या नियमानुसार कर्जफेडीची मुदत संपलेल्या शेतकर्‍यांना नोटीस पाठवून बँकाकडून वसुलीसाठी ह्यतगादाह्ण सुरू आहे. सततच्या नापिकीने मेटाकुटीस आलेल्या बळीराजा आता बँकांच्या या तगाद्यात चिंताग्रस्त झाला आहे. सन २00९ साली तत्कालीन राज्य शासनाने संपूर्ण कर्ज माफी दिली. त्यानंतर सन २0१0 पासून शेतकर्‍यांसाठी नवीन कर्जपुरवठा सुरू केला; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने सन २0११ मध्ये शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. त्यानंतर सन २0१२ मध्ये अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील असंख्य शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत शेतकर्‍यांची कर्जाच्या फेर्‍यातून सुटका व्हावी, शेतकर्‍यावरील कर्जाचे ओझे कमी व्हावे म्हणून शासनाने सन २0१0 साली सुवर्ण तारण कर्ज योजना अमलात आणली. या सुवर्ण तारण योजनेसाठी सुरुवातीला ४.३ टक्के व्याजदर आकारण्यात आले; मात्र आरबीआयने ताशेरे ओढल्यानंतर व्याजदरात वाढ करण्यात आली. आता या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना १0.१५ टक्के व्याजाची आकारणी केली जात आहे. तथापि, चार-पाच वर्षात अवकाळी पाऊस, अतवृष्टी, दुष्काळ यामुळे शेतकर्‍यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे बँक नियमानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सोने बँकेत तारण राहिले व त्याच्या मूळ किमतीपेक्षा व्याजासह रक्कम शेतकर्‍याच्या कर्ज खात्यात नोंदविल्या गेली तर सदर सोन्याचा लिलाव करून कर्ज वसुली केली जाते. दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे खामगाव येथील व्यवस्थापक अशोक सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुवर्णतारण कर्ज योजनेंतर्गत शेतकर्‍यांना सहामाही व्याज आकारणी करून कर्ज वितरित करण्यात आले. तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. शेतकर्‍यांनी नियमित व्याजाचा भरणा केल्यास बँक सुविधा देते. सक्तीची वसुली केली जात नसली तरी, कर्ज माफीच्या आशेमुळे शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाहीत. त्यामुळे सुवर्ण तारण योजनेतही अनेक शेतकर्‍यांकडे थकबाकी असल्याचे त्यांनी सांगीतले.