शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बंदच्या ‘अड’कित्त्यात हमाल, तोलणारांची उपासमार!

By admin | Updated: July 21, 2016 00:55 IST

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांना अडत्यांच्या बंदचा फटका.

चिखली (जि. बुलडाणा): दुष्काळ व अत्यल्प उत्पन्नामुळे यावर्षी बाजारात शेतमालाची आवक आधीच कमी आहे. त्यातच सध्या पेरणी-पावसाचे दिवस असल्याने शेतमालाच्या हमालीतून मिळणार्‍या तुटपुंज्या मिळकतीतून कसा-बसा प्रपंच चालविणार्‍या येथील बाजार समितीतील हमाल व तोलणारांवर आता नवे संकट उभे ठाकले असून, शासनाच्या अडत बंदच्या निर्णयामुळे व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डतील व्यापार्‍यांनी शासनाच्या अडत बंदच्या निर्णयामुळे आठवडाभरापासून अडत दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मार्केट यार्डवर सर्वत्र शुकशुकाट आहे. तसेच सध्या पेरणी-पावसाचे दिवस असल्याने सर्व शेतकरी खरीप हंगामात व्यस्त असल्याने बाजार समितीत शेतमालाची आवकच नाही. त्यातही आता अडत दुकाने बंद असल्यामुळे या अडत दुकानांमध्ये तोलाई व हमाली करून उदरनिर्वाह चालविणारे परवानाधारक हमाल व तोलणार कामगार यामध्ये भरडल्या जात असून, हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हमाल व तोलणार कमागारांनी २0 जुलै रोजी बाजार समितीला निवेदन देऊन येत्या तीन दिवसांत बाजार समितीचे व्यवहार तातडीने सुरळीत न झाल्यास समितीचे संचालक गजानन पवार यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हमाल व तोलणार यांनी दिला आहे.