शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

संस्थात्मक विलगीकरण कार्यवाहीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न बुलडाणा : सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असताना बुलडाणा शहरात मात्र पिवळसर असे दूषित पाणीपुरवठा होत आहे. ...

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न

बुलडाणा : सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असताना बुलडाणा शहरात मात्र पिवळसर असे दूषित पाणीपुरवठा होत आहे. पालिकेच्या नळयोजनेद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येतो.

पीक कर्ज वाटप मेळाव्याचा विसर

मेहकर : जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून महसूल विभाग व सहकार विभागाच्या विद्यमाने दरवर्षी कृषी कर्जवाटप मेळावा घेण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनामुळे पीक कर्ज वाटप मेळाव्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कर्जवाटपाबाबत शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा या मेळाव्यातून घेणे गरजेचे आहे.

बालसंस्कार शिबिराला फटका

मेहकर : तालुक्यातील विविध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या बालसंस्कार शिबिराला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. शिबिराच्या माध्यमातून संस्कृत, मृदंग यासह विविध धार्मिक कार्य महत्वपूर्ण पध्दतीने पार पडले जाते. एक महिना बाल सुसंस्कार शिबिर राबविण्यात येते.

दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

बुलडाणा : जिल्हा रुग्णालय येथे नियमितपणे दर महिन्याला एक दिवस होणारे दिव्यांग तपासणी शिबिर कोरोनामुळे वारंवार रद्द करावे लागत आहे. अस्थिव्यंग, नेत्र, मनोरुग्ण, मतिमंद, कान नाक, घसा संबंधित दिव्यांग तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येते.

रस्त्यांचे भाग्य केव्हा उजळणार

देऊळगाव राजा : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे केव्हा भाग्य उजळणार असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने मंजूर केलेल्या निधीतून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच सुरू करणार असल्याची माहिती आहे. परंतु अद्याप ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.

आरटीई प्रवेशासाठी दिरंगाई

सिंदखेड राजा : शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे यावर्षी आरटीई प्रवेशाचे नियोजन हुकले आहे. शालेय व्यवस्थापनावर शिक्षण विभागाचा कोणताही अंकुश नसल्याने प्रवेशाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी विलंब होत असल्याने पालक चिंतेत आहेत.

विद्युत तारांमध्ये येणाऱ्या वृक्षांची छाटणी

हिवरा आश्रम : ग्रामीण भागात महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यासाठी विद्युत तारांच्या मध्ये येणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. परंतु महावितरणच्या या मान्सूनपूर्व कामामुळे परिसरातील विद्युत पुरवठा वांरवार खंडित करण्यात येत आहे.

स्मार्ट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

बुलडाणा : कॅशलेस व्यवहाराच्या स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची नोंदणी करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक आगाराला संगणकाचे वितरण करण्यात आले आहे. कॅशलेस व्यवहाराच्या या कामाची व नोंदणीची जबाबदारी प्रत्येक ठिकाणी सोपविण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत अनेक लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड मिळालेले नाही.

हळद लागवडीला सुरूवात

बुलडाणा : ११ महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या हळद पिकाची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी यंदा हळद पीक घेत आहेत. साधारणपणे हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जून महिन्याच्या मध्यापर्यंत केली जाते. मे-जूनमध्ये लागवड केलेले हळदीचे पीक जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत काढणीस तयार होते. हळद लागवड १५ जूनपेक्षा उशिरा झाल्यास उत्पादनात घट येते. त्यामुळे सध्या हळद लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

बुलडाणा तालुक्यात ४० पॉझिटिव्ह

बुलडाणा : तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सर्वच तालुक्यात आता कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. परंतु प्रत्येकाने कोरोनाची त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.