लोकमत न्यूज नेटवर्ककोथळी (मोताळा) : येथील राजमाता जिजाऊ काँन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे नको म्हणून पुस्तक बँक उघडण्यात आली आहे. विद्यार्थी शाळेत आल्यावरच त्यांना पुस्तके दिल्या जातात. कोथळी येथील राजमाता जिजाऊ इंग्लीश स्कुलमध्ये ६० मुले शिक्षण घेतात. यातील बहुतांश मुले मुली गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे ती मुले पाठीवर दप्तराचे ओझे व वॉटर बॅग घेऊन शाळेत येतात. ही बाब शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली वानखडे, सहाय्यक शिक्षीका सिरसाट, थिगडे यांच्या लक्षात आली. त्यांनी याकडे गांभिर्याने बघत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला. दप्तराचे ओझे व वॉटरबॅग घेऊन येणारे विद्यार्थी आजारी पडत होते. काहींना शाळेत यायचा कंटाळा यायचा यातून मार्ग म्हणून संस्था संचालिका रेखा ठोंबरे यांच्याशी चर्चा करुन शाळेत वॉटर फिल्टर बसवून वॉटर बॅगचे ओझे कमी केले. तर प्रत्येक वर्ग खोलीत पुस्तकाची रॅक उभारुन पुस्तकाचे रोज ने आण करण्याचे ओझे कमी झाले. फक्त रोज घरी जाताना पुस्तके जमा करण्याचा व आल्यानंतर पुस्तके देण्याचा त्रास वाढला परंतु पुस्तकाचे ओझे कमी झाले.
दप्तराचे ओझे टाळण्याकरिता कॉन्व्हेटमध्येच उघडली पुस्तक बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:23 IST
कोथळी (मोताळा) : येथील राजमाता जिजाऊ काँन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे नको म्हणून पुस्तक बँक उघडण्यात आली आहे.
दप्तराचे ओझे टाळण्याकरिता कॉन्व्हेटमध्येच उघडली पुस्तक बँक
ठळक मुद्देकोथळी येथील राजमाता जिजाऊ इंग्लीश स्कुलप्रत्येक वर्ग खोलीत पुस्तकाची रॅक शाळेत वॉटर फिल्टर बसवून कमी केले वॉटर बॅगचे ओझे