शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष

By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST

मनसे, राष्ट्रवादी, सेनाही लागली कामाला !

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात याहीवेळी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, असा तिहेरी सामना होणार असल्याने, तीनही पक्ष आपआपल्या परिने कामाला लागले आहेत. गेल्या १५ वषार्ंपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ आपल्या ताब्यात कसा येईल, यासाठी शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे शिवसेना सतत पराभूत होत असल्याने हा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाकडेही मतदारसंघाचे लक्ष असून, शिवसेनेचा उमेदवार कोण राहणार, याची कमालीची उत्सुकता आहे.सिंदखेडराजा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वच ठिकाणी निर्विवाद सत्ता आहे. आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सलग चार वेळा विजय मिळविला आहे. आमदार शिंगणे यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजतरी उमेदवारी जाहीरपणे कोणी मागितली नाही; परंतु माजी आमदार तोताराम कायंदे यांनी पक्षश्रेष्ठीकडे फिल्डींग लावली आहे. डॉ.शिंगणे हे हा मतदार संघ कदापि सोडण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे तोताराम कायंदे यांचे आमदारकीचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार डॉ.शिंगणे यांनाच असल्याने त्यांना डावलून उमेदवारी जाहीर होणे सध्या तरी शक्य वाटत नाही. ज्या ठिकाणी शिंगणे त्या ठिकाणी आम्ही अशीही मानसिकता मतदारांची असल्याने डॉ.शिंगणे सिंदखेडराजा सोडून दुसर्‍या मतदार संघात ते उभे राहतील! ही चर्चाही धुसर झाली आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात कोणी दिसत नसले तरी ह्यछुपा वारह्ण काही असंतुष्ट करु शकतात. डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेमुळे जे मतदार पोळले आहे, त्यांची नाराजी शिंगणे यांना चांगलीच भोवणार आहे. जर डॉ.शिंगणे यांनी उमेदवारी नाकारली तरच नवीन चेहरे समोर येऊ शकतात. त्यात जि.प.सदस्य दिनकरराव देशमुख हे खास विश्‍वासातील एक व्यक्ती आहेत. तर संतोष खांडेभराडही समोर येऊ शकतात. हा जर तरचा विषय आहे. शिवसेना पक्षाकडून दोनवेळा उमेदवारी मिळवूनही प्रचंड मतांनी पराभव स्वीकारलेले डॉ.शशिकांत खेडेकर तिसर्‍या टर्मसाठी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनीही प्रत्येक गावात जावून जनसंपर्क वाढविला आहे. दोनवेळा पराभव झालेल्या व्यक्तीला तिसर्‍यांदा उमेदवारी देऊ नये, असा पवित्रा काही जुन्या शिवसैनिकांनी घेतल्याने डॉ.खेडेकर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. उमेदवारीच्या रिंगणात दिलीप वाघ त्याच बरोबर दादाराव खार्डे, रवींद्र पाटील यांनीही कंबर कसली आहे; पण डॉ.शशिकांत खेडेकर नको, हा सूर मोठय़ा प्रमाणात आवळल्या जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार जरी ठरला नसेल तरी लोकांना चालणारा उमेदवार देण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळे मेरिट यादी पाहिली जाणार आहे. मनसेकडून जि.प.सदस्य विनोद वाघ हे दुसर्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीही मतदार संघात जनसंपर्क वारी सुरू केली आहे. शाखा स्थापन आणि संपर्क रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन मतदारांसोबत चर्चा केली आहे. राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा युवक वर्ग ही विनोद वाघ यांची जमेची बाजू आहे.