शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मद्यासाठी एकास जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेत संदीप बाबूराव निकाळजे हा जखमी झाला आहे. ...

ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेत संदीप बाबूराव निकाळजे हा जखमी झाला आहे. प्रकरणी पोलिसांनी जखमी संदीप निकाळजे याच्या आईच्या तक्रारीवरून विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोपाळ रामभाऊ उबाळे (रा. किनगाव राजा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.

जखमी संदीप बाबूराव निकाळजे आणि आरोपी विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोकुळ रामभाऊ उबाळे हे किनगाव राजा येथे सोबत मद्यपान करीत होते. त्यातच त्यांच्यात वाद होऊन तो विकोपाला गेला. त्यातच विजय मुंढे आणि गोकुळ उबाळे या दोघांनी संदीप निकाळजे याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यामुळे संदीपच्या अंगावरील टी-शर्ट पेटून त्याच्या दोन्ही हातांना, पोटाला, छातीवर, चेहऱ्यावर तसेच कानाला भाजल्यामुळे जखमा झाल्या आहेत.

संदीप निकाळजे याची आई सत्यभामा बाबूराव निकाळजे (५०) यांनी या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश बनसोडे, हेड कॉन्स्टेबल राजू दराडे, गजानन सानप, रोशन परशुवाले, जाकेर चौधरी, जाकेर पठाण हे करीत आहेत. या घटनेत संदीप निकाळजे हा १० ते १५ टक्के भाजला असल्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले.