शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

दरी तेथे बांध योजनेस जलसंधारण विभागाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

अनुषंगिक विषयान्वये मुंबई येथील जलसंधारण मंत्र्यांच्या दालनात शुक्रवारी बैठक पारपडली. त्यावेळी ही तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. बुलडाणा व ...

अनुषंगिक विषयान्वये मुंबई येथील जलसंधारण मंत्र्यांच्या दालनात शुक्रवारी बैठक पारपडली. त्यावेळी ही तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. बुलडाणा व मोताळा तालुका हा जिगाव प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियात येतो. त्यामुळे या पट्ट्यात साठवण तलावाला परवानगी मिळत नाही. त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदार संघातील वनपरिसरातील अनेक ठिकाणी पाणी नसल्याने हिंस्त्र प्राण्यांचा पाण्याचा शोधात परिसरातील गावालगत वापर वाढतो. त्यातून जीवित हानी तथा वित्त हानी होत आहे. ते टाळण्यासाठी ‘दरी ते बांध’ ही संकल्पना राबविण्याचे विचाराधीन होते. त्याचा पाठपुरावा आ. गायकवाड यांनी केला. या संदर्भात आता जलसंधारण मंत्री सकारात्मक असल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट झाले. बुलडाणा व मोताळा तालुक्यात सिंचनाच्या दृष्टीने ७ पाझर तलाव निर्माण करण्यात येणार आहे. बुलडाणा विधानसभा मतदार संघात डोंगरी भागातील वनपरिक्षेत्र परिसरात दरी तेथे बांध बांधण्यात येणार आहे.

या बैठकी जलसंधारण विभागाचे सचिव, जलसंधारण विभागाचे अधिकारी फुलंब्रीकर, जिल्हा संधारण अधिकारी अमोल मुंढे, मयुर बाहेकर उपस्थित होते.

--असे राहतील बांध--

डोंगरखंडाळा परिसरात पाच तलाव, गिरडा परिसरात पाच साखळी बांध, मोताळा तालुक्यात मूर्ती येथे तलाव, बुलडाण्या लगतच्या ऋषी खोरा व राजूर भागातील

खोऱ्यात हे बांध राहणार आहे. या प्रकल्पामुळे मुर्ती परिसरात २५० हेक्टर जमीन, डोंगरखंडाळा येथे ४०० हेक्टर, गिरडा परिसरात ४०० हेक्टर जमीन व व ऋषी खोऱ्यातील खडकी, राहेरा, व दाभा येथे ३०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.