शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: January 7, 2015 00:31 IST

नोकरीचे आमीष दाखवून बुलडाणा जिल्ह्यातील तरूण विद्यार्थ्यांंचे फसवणुक प्रकरण.

बुलडाणा : शहर व परिसरातील तरुण विद्यार्थ्यांंची दिशाभूल करून कॉम्प्युटर जॉबवर्कच्या नावाखाली त्यांची लाखो रुपयाने फसवणूक करून फरार झालेल्या आरोपींचा जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.याबाबत २३ मे २0१४ रोजी किरण दिनकर गवई याने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला सविस्तर तक्रार देऊन आरोपी युसुफ नासीर बाणवाली, नासीर हुसेन बागवाला यांना अटक करण्याची मागणी केली होती; मात्र सदर आरोपी शहरातील त्यांचे दुकान बंद करून फरार झाले होते. याप्रकरणी फसवणूक झालेले पवनकुमार तायडे १0,४३,३८0, विवेक उबरहंडे ९000, वैशाली कोलते ५,६५,५00, नरेश इंगळे १0,४३,३८0 विवेक उबरहंडे ९000, वैशाली कोलते, ५,६५,५00, नरेश इंगळे १0,६३,६८0, प्रकाश जाधव ५0,000, सुदाम काकुर्डे २९000, राहुल दांदले ३७00 असे व इतर साक्षीदार मिळून ३५,८९,५४0 रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले होते.बुलडाणा पोलिसांनी पुणे, मुंबई येथे आरोपींचा शोध घेतला. त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांचे पुणे येथील विविध बँकात असलेले खाते सिल केले; परंतु सदर वरील आरोपी हे त्यांच्या जाळय़ात सापडले नाहीत. विद्यमान न्यायालयाने त्यांच्या पहिला अटकपूर्व जामीन अर्जाच्या विरोधात आरोपीने जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल केला होता. तो जामीन अर्ज ५ डिसेंबर २0१४ रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता, तर तिसर्‍यांदा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय जोशी यांच्या न्यायालयात २ जानेवारी २0१५ रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सदर अर्ज ५ जानेवारी रोजी न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावत, सदर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. यावेळी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विजय सावळे यांनी युक्तिवाद केला.