शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन मानधनाचा पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना लाभ

By admin | Updated: July 4, 2017 00:11 IST

विविध संघटनांच्या आंदोलनाला यश : रिक्त पदे भरण्याची मागणी

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अंगणवाडी सेविकांना मानधन दोन ते तीन महिने मिळण्यास विलंब होत होता. याबाबत विविध संघटनांनी अनेकदा आंदोलन करून मानधन वेळेवर देण्याची मागणी केली होती. याबाबतची दखल महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेऊन आॅनलाइन मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील ५ हजार १७१ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना होणार आहे.ग्रामीण भागातील गोर-गरिबांच्या घराची चिमुकले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. बुलडाणा जिल्ह्यासाठी २ हजार ५७७ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती, तर काही भागात १४१ मिनी अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. यासाठी २ हजार ५२१ अंगणवाडी सेविका, २ हजार ५१६ अंगणवाडी मदतनिस व १३४ मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत; मात्र सदर अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविका यांना नियमित मानधन देण्यात येत नव्हते. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबियांना अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबत विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली. यावेळी मानधन नियमित मिळण्याचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात येत होता. याची दखल महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा शुभारंभ ३ जुलै २०१७ रोजी करण्यात आला. त्याचा फायदा राज्यातील २ लाख ६ हजार व जिल्ह्यातील ५ हजार १७१ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनेत आनंद व्यक्त होत आहे.सेविका-मदतनिसांची रिक्त पदे भरण्याची मागणी४जिल्ह्यात अंगणवाडी सेविका यांची ५४ पदे रिक्त असून, मदतनिसांची ६१ व मिनी अंगणवाडी सेविकांची ७ असे एकूण १२२ पदे रिक्त आहेत. सदर पदे त्वरित भरण्याची मागणी संबंधित रिक्त पदे असलेल्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.अंगणवाडी सेविका-मदतनिसांचे मानधन आॅनलाइन देण्याचा निर्णय चांगला असून, काही ठिकाणी असलेली रिक्त पदे भरण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन अंगणवाडी सेविका-मदतनिसांची रिक्त पदे भरावीत. -पंजाबराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना(सिटू).अंगणवाडी सेविका व मदतनिसांना आॅनलाइन मानधन मिळणार असल्यामुळे त्यांना नियमित मानधन मिळणार असून, अडचणीपासून सुटका झाली आहे. -सी.बी.चेकेउपमुकाअ , महिला व बालकल्याण जि.प.बुलडाणा