बुलडाणा : मेहकर, लोणार व सिंदखेडराजा, शेगाव, खामगाव, चिखली, नांदुरा तालुक्यातील तहसिल कार्यालयांसमोर विविध मागण्यांसाठी कृषि अधिकारी व कर्मचार्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.
चिखली : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गामधील अधिकारी, कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी ११ ऑगस्ट पासून धरणे आंदोलन सुरू केले.आज १२ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तांत्रिक संवर्गातील वेतनङ्म्रेणी, दर्जावाढीबाबत मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, कृषी विभागातील काही योजना जि.प.कडे हस्तांतरीत करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करा, अधिकारी, कर्मचार्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, मारहाणीबाबत अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा, कृषी पर्यवेक्षक संवर्गातील सर्व पदे शंभर टक्के कृषी सहायकातून पदोन्नतीने भरावीत, सहायक व पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करावी, कृषीसेवकांची तीन वर्षांची सेवा अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरावी, आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी आंदोलन कर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात तालुका कृषी अध्धिकारी सी.जी.शेळके, मंगेश भुसारी, मधुकर कावळे, ऐ.ऐ.हाके, इलग, व्ही.एस.शेळके, मेहेत्रे, एम.पी.देशमुख सहभागी झाले.
मेहकर: कृषी विभागातील तांत्रीक संवर्गातील अधिकारी व कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी स्थानिक तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले असून, सात दिवसाच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास आझाद मैदान मुंबई येथे सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत उपोषण सुरु करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ उपविभाग मेहकरचे अध्यक्ष मधुकर काळे यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनात धनंजय सोनुने, रमेश देशमुख, विवेक सोनवणे, छगनराव शेळके, विनय इसोकार, अनिल बोंडे, बी.यु.बनसोडे, व्ही.पी.सरोदे, व्ही.बी.सुसर, मोडकर, एम.आर.मोठे, एस.एच.चव्हाण, डी.एल.लंबे, व्ही.एच. राजुरकर, डी.एन.भराड, मेहेत्रे, बोर्डे, सिरसाट, धांडे, पवार, वैराळ, कंकाळ, बंडगर, बोराडे, बोडखे, काळे, राठोड, सिरसाट आदी उपस्थित होते.
सिंदखेडराजा : स्थानिक तहसिल कार्यालयासमोर तालुका कृषी अधिकार्यांच्यावतीने धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. कृषी अधिकारी व कर्मचार्यांच्या मागण्या मान्य न केल्यास १६ ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कृषी अधिकार्यांनी तहसिलदार व उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील, तिडके, शिंदे यांच्यासह ३६ कर्मचार्यांची उपस्थिती होती.
लोणार : कृषी अधिकारी व कर्मचार्यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्थानिक तहसिल कार्यालयासमोर तालुक्यातील कृषी अधिकार्यांनी धरणे आंदोलन सुरु केले असून, यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार मनिष गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी विवेक गायकवाड, विलास जाधव, पी.एस.साळवे, संजय चवरे, कोल्हे, कायंदे, डि.पी.वाघ, ए.पी.वायाळ, सी.टी.खरात, ए.यु.शिपे, आर.एम.पांडे, राजेश सिरसाट आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे प्रा.बळीराम मापारी यांनी सदर धरणे आंदोलनाला भेट देऊन पाठींबा दर्शविला.
शेगाव : कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 0२ मधील अधिकारी व कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज मंगळवारी येथील तहसिल कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषि सेवा महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण सोळंके, प्रमोद उकर्ड, विलास परीहार, भाऊसाहेब दगडखैर, भाऊसाहेब खेळकर, सतिष बोडखे, व्हि.एस.पाटील, सोनिया भारती, ज्योती ठाकरे, सुनिता जाधव, मिंलिद पाचपोळ, उद्धव चव्हाण, प्रतिभा पाखरे, धिरज मारोळकर, सुधाकर सोळंके, अरुण चव्हाण, आर.एम. जाधव, उद्धव जायभाये यांच्यासह कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 0२ मधील अधिकारी व कर्मचार्यांनी सहभागी झाले होते. सायंकाळी शिष्टमंडळाने तहसिलदार डॉ. रामेश्वर पुरी यांना निवेदन सादर केले.
खामगाव : येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ संलग्नीत निबंध शाखेच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात उपाध्यक्ष अनिल बोंडे, एम.डी.जाधव, जी.सी.कोठारी, जे.टी.भिसे, आर.एम.आंबरे, आर.व्ही.मय्यर, जे.आर.पवार, आर.एम.गारवे, एल.डी.सुरडकर, डी.एस.पाटेखेडे, व्ही.बी.सरदार यांच्यासह कृषी विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.
नांदुरा : येथे सुध्दा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या कर्मचार्यांनी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर मागण्या मंजुर न झाल्यास १४ पासून सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. आंदोलनात महासंघाचे राज्य सरचिटणीस विक्रांत परमार, टुकरे, गवई, पाटील, बागुल, यासह आदी सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते.