शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांवर नियमांना खो!

By admin | Updated: June 21, 2016 23:28 IST

कृषी विभागाचे दुर्लक्ष; बियाण्यांच्या उगवणशक्तीची शेतक-यांना शाश्‍वती नाही!

बुलडाणा: शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या रासायनिक खताचा तुटवडा सांगून, त्यांच्या मस्तकी दुसरेच खत मारले जाते. खरेदी केलेल्या बियाण्याचे पक्के बिल शेतकर्‍यांना दिले जात नाही. बहुतांश कृषिसेवा केंद्रावर संगणक प्रणाली नाही, शिवाय दुकानात लावलेल्या फलकांवरील बियाणे प्रत्यक्षात उपलब्ध नसण्यासारख्या अनेक समस्यांचा शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याने, कृषी सेवा केंद्रावर खते-बियाणे विक्रीसंदर्भातील नियमांना खो बसत आहे.जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी खत, बियाणे खरेदी करण्याकरिता कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करीत आहेत. शेतकर्‍यांकडून अचानक खत-बियाण्याची मागणी वाढल्याने कृषी सेवा केंद्रावर शेतकर्‍यांची आर्थिक लूट केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ह्यलोकमतह्णने शहरातील १५ दुकानांची प्रत्यक्ष पाहणी केली. यादरम्यान लोकमत चमूने तेथे हतेडी, साखळी बु., कोलवड, पांगरी, तांदुळवाडी, नांद्रा कोळी येथून खत, बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला असता, हे चित्र स्पष्ट झाले. बर्‍याच दुकांनामध्ये बिलिंग करण्यासाठी संगणक प्रणाली आढळून आली नाही, शिवाय बी-बियाणे, खत नोंदणीचे रेकॉर्ड संगणकाऐवजी साध्या वहीत ठेवण्यात आल्याचे आढळून आले. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून दुकानाबाहेर बी-बियाणे, खत आदीची दरफलक लावण्यात आले होते; मात्र त्यावर दर्शविलेले बियाणे प्रत्यक्षात दुकानात नसल्याचे तेथे उपस्थित शेतकर्‍यांनी लोकमत चमूला सांगितले.