शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 23:51 IST

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांतील शासकीय नळ पाणीपुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारावर १५ आॅगस्टपर्यंत कार्यालयामार्फत कारवाई करावी; अन्यथा जुन्या वस्तूचा अहेर सप्रेम भेट देऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुबोध सावजी यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद बुलडाणा यांना दिला.

ठळक मुद्दे१५ आॅगस्टनंतर अहेर आंदोलनसुबोध सावजी यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांतील शासकीय नळ पाणीपुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारावर १५ आॅगस्टपर्यंत कार्यालयामार्फत कारवाई करावी; अन्यथा १५ ते २२ आॅगस्ट या कालावधीत कार्यालयात फ्लेक्स, कॅरोना, रेडचिफ इत्यादी कंपनीच्या जुन्या वस्तूचा अहेर सप्रेम भेट देऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुबोध सावजी यांनी शनिवारला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद बुलडाणा यांना पत्राद्वारे दिला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांत शासकीय नळयोजनेची कामे झालेली आहेत व सुरू आहेत. दुरुस्तीची कामेही झालेली आहेत. यामध्ये भ्रष्टाचार आहे, तो दूर करण्यासाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठित केली आहे. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून संग्रामपूर येथील वा.रा. पिसे, देऊळगाव राजा येथून प्रदीप नागरे, चिखली येथून प्रमोद पाटील, तर शेगाव येथून अमित जाधव, खामगाव येथून अंबादास पाटील, मोताळा येथून सुनील कोल्हे, लोणार येथून सुनीता भांड, संग्रामपूर येथून राजू राठोड, शेगाव येथून संजय तारापुरे, जळगाव जामोद येथून रमेशचंद्र घोलप, मोताळा येथून रवि पाटील, लोणार येथून खानसेठ, सिंदखेड राजा येथून गणेश राजे जाधव, तर मेहकर येथून गणेश जुनघरे, नांदुरा येथून गजानन वडतकर, लोणार येथून खुशालराव गायकवाड यांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून २८ जुलै ते १० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय नळ पाणीपुरवठा भ्रष्टाचाराची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये किमान २००० कोटींचा भ्रष्टाचार आहे. त्यावर १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत कारवाई न केल्यास माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या नेतृत्वात अहेर आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्यावतीने देण्यात आला आहे.