शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुक्यात ३३० लोटा बहाद्दरांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 22:43 IST

धाड : स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेची मोहीम तीव्र करत गेल्या २० दिवसांपासून पंचायत समिती बुलडाणाच्यावतीने गावोगाव गुडमॉर्निंग पथक पाठवून उघड्यावर शौचास बसणारांवर कारवाई करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देलोट्यासह केले पोलिसांच्या स्वाधीनस्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत गुडमॉर्निंग पथकाची कारवाई१२ हजार रु. आर्थिक अनुदान; मात्र ४0 टक्के जनता जाते उघड्यावरच

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेची मोहीम तीव्र करत गेल्या २० दिवसांपासून पंचायत समिती बुलडाणाच्यावतीने गावोगाव गुडमॉर्निंग पथक पाठवून उघड्यावर शौचास बसणारांवर कारवाई करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.अगदी पहाटे दिवस उजाडण्याच्या पूर्वी मोकळ्या रोडवर, शिवारात, पांदण रस्त्याने, प्रत्येक गावात ठराविक दिशेला महिला आणि माणसांची गर्दी बसलेली दिसायची. काही जण सकाळी तर काही जण सायंकाळी उघड्यावर बसल्याने त्यातून निर्माण होणारे साथीचे आजार व त्याचे परिणाम सार्वत्रिक स्वरूपाचे असतात, म्हणून शासनाने सुलभ शौचालय बांधकामास प्रोत्साहन म्हणून ग्रामीण भागात १२ हजार रु. आर्थिक अनुदान ग्रा.पं. च्या माध्यमातून वाटप करणे सुरू केले आहे. तरीही ४० टक्के नागरिक हे सर्रास उघड्यावर शौचास जातात, ही बाब चिंतनीय आहे. पंचायत समितीचे बीडीओ बाळासाहेब वाघ आणि त्यांचे कर्मचारी वर्गाने गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करून बुलडाणा तालुक्यातील गावांमधून अगदी पहाटेच गावशिवारात उघड्यावर शौचास जाणाºयांवर धडक कारवाई करत लोट्यासह लोकांना पकडून पोलिसात दिले. आज बुलडाणा तालुक्यातील किमान ३० गावात गुडमॉर्निंग पथकाने फिरून ३३० जणांना पकडून पोलिसात दिले. त्यांची सुटका त्यांना न्यायालयात ३०० रु. दंड भरून मिळाली. अवघ्या २० दिवसात गुडमॉर्निंग पथकाचे प्रमुख बीडीओ बाळासाहेब वाघ यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणे ही बाब सर्वश्रुत आहे. त्यात काही विशेष नाही, असाच समज नागरिकांचा आहे. मुळात उघड्यावर जाणे हे आजारास निमंत्रण देणारे व सार्वजनिक आरोग्य धोक्यात टाकणारे आहे, हे कुणी समजून घेत नाही. कित्येक जणांना पकडले की, गमतीशिर उत्तरे मिळतात. बहुतेकांजवळ शौचालय असतानाही बाहेर जातात, ही बाब बाहेर आली. त्यामुळे पथकाची कारवाई सुरूच आहे.-