बुलडाणा, दि. १३- तडीपार आरोपी शेख नफीज ऊर्फ बाब्या शेख हफीज (वय २५) या तडीपार आरोपीस १२ ऑक्टोबरला येथे पोलीसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. ठाणेदार पोलीस निरीक्षक ए.के. हिवाळे यांना १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३0 वाजेच्या सुमारास तडीपार आरोपी शेख नफीज ऊर्फ बाब्या शेख हफीज (२५) हा शहरामध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी डी.बी. पथकाचे प्रमुख स.पो.नि. हरीश ठाकूर, पोहेकॉ दिलीप जाधव, पोना सुधीर मगर, राजू चौधरी, पोकाँ शांताराम घुगे, कृष्णा निकम यांनी शहरामध्ये शोध घेऊन तडीपार आरोपी हा धाड नाक्यावरील हॉटेल बंजाराचे खुले मैदानात अंधारात बसल्याचे माहिती झाल्याने डी.बी. पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले व त्याच्या विरुद्ध अपराध नंबर ४४३/१६ कलम १४२ मुपोका प्रमाणे गुन्हा दाखल केला. करून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
तडीपार आरोपी ताब्यात
By admin | Updated: November 14, 2016 02:45 IST