शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड योजनेंतर्गतची ८६ टक्के झाडे जगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 11:27 IST

Forest department News : चार वर्षात लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी तब्बल ८६ टक्के झाडे जगली असल्याचा दावा सामाजिक वनिकरण विभागाने केला आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी तब्बल ८६ टक्के झाडे जगली असल्याचा दावा सामाजिक वनिकरण विभागाने केला आहे. दरम्यान चालू वर्षी आतापर्यंत ११ लाख २३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या आठवड्यात सिंदखेड राजा पंचायत समितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत सिंदखेड राजा तालुक्यात २ लाखांपेक्षा अधिक झाडे लावल्याचा दावा अधिकाऱ्याने करत बहुतांश झाडे जगल्याचे सांगितले होते. त्यावर प्रत्यक्ष झाडांची पाहणी आपण व्यक्तीश: करणार आहोत. यादी तयार ठेवा असे सुचक वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. त्या आधारावर गेल्या चार वर्षात जिल्ह्यात झालेल्या वृक्ष लागवडीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता विभागीय वन अधिकारी बी. एन. पायघन यानी ही माहिती दिली. २०१७ पासून ही वृक्ष लागवड योजना सुरू झाली असून यामध्ये २०१७ ते २०२० या कालावधीत २३ लाख ४ हजार ६६८ झाडे लावण्यात आली असून त्यापैकी १९ लाख ७५ हजार ३९६ झाडे जगल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा ८ लाख झाडे लावलीn २०२१ मध्ये आतापर्यंत ८ लाख १७ हजार झाडांचा विनियोग झाला असल्याचे विभागीय वन अधिकारी बी. एन. पायघन म्हणाले. दरम्यान ११ लाख २३ हजार छोटी रोपे व ३ लाख ९८ हजार मोठी रोपे (उंच रोपे) अशी एकूण १५ लाख २१ हजार रोपे उपलब्ध होती. त्यापैकी ३ लाख राेपे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग