शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

८२ हजार मातीचे नमुने तपासणार

By admin | Updated: June 19, 2015 02:37 IST

मृद आरोग्य पत्रिका अभियान; तेरा तालुक्यातील २९३ गावांचा समावेश.

नीलेश शहाकार / बुलडाणा : शेतजमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शासनाकडून मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येत आहे. यातून प्रत्येक शेतकर्‍याला त्यांच्या शेताची मातीची आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. तीन वर्षात जिल्ह्यातील २९६ गावातून ८२ हजार २५९ मातीचे नमुने तीन प्रयोगशाळेतून तपासली जाणार आहे. सन २0१५-१६ या वर्षासाठी २७ हजार नमुन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रासायनिक खतासह अन्य बाबींच्या अतिवापरामुळे खालावलेले जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र शासन यंदापासून ह्यमृद आरोग्य पत्रिकाह्ण अभियान राबवित आहे. या अभियानातून बुलडाणा जिल्ह्यामध्ये ७ लाख ४८ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रातून ८२ हजार २५९ माती नमुने तपासले जाणार असून, जवळपास ५ लाख ४८ हजार ६६६ शेतकर्‍यांना जमीन आरोग्य पत्रिका दिली जाणार आहे. तीन वर्षे हा उपक्रम सुरू राहणार असून, यंदा पहिल्या वर्षी २९६ गावांतील २७ हजार ७४७ माती नमुन्यांची तपासणी करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले असून, त्याचा उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे. रासायनिक खताचा वापर कमी करून मृद तपासणीच्या आधारावर अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खताच्या संतुलित मात्रा मिळावी. जैविक खते, सेंद्रिय, गांडूळ, निंबोळी, सल्फर अच्छादित युरियासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणार्‍या खताच्या वापरास प्रोत्साहन देणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी जिल्ह्यात मृद आरोग्य पत्रिका अभियानह्ण राबवित येत आहे. यामुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार असून, त्यांना पेरणीचे नियोजन करता येईल.