शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के शेतक-यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:38 IST

बुलडाणा : अल्पभूधारक थकीत शेतकºयांची दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा शासनाने केली होती; मात्र पुनर्गठन केलेल्या शेतकºयांना नियमित खातेधारकांमध्ये गणल्या गेल्याने जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार होते.

ठळक मुद्देपुनर्गठित शेतक-यांचे कर्ज माफ केल्याने मिळाला दिलासा!आधार कार्डच्या पावतीची सुविधाकार्यकर्ते देणार शेतक-यांना माहिती

विवेक चांदूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अल्पभूधारक थकीत शेतकºयांची दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा शासनाने केली होती; मात्र पुनर्गठन केलेल्या शेतकºयांना नियमित खातेधारकांमध्ये गणल्या गेल्याने जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार होते. आता शासनाने कर्जमाफीमध्ये पुनर्गठन केलेल्या शेतकºयांचा समावेश केल्याने या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आॅगस्ट महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असून, सप्टेंबर महिन्यात शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.वºहाडात शेतकºयांनी घेतलेल्या कर्जाचे मोठ्या प्रमाणात पुनर्गठन करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी शासनाने पुनर्गठनाची सुविधा निर्माण केल्यानंतर जवळपास ८० टक्के शेतकºयांनी पुनर्गठन केले. त्यामुळे सदर शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते; मात्र शासनाने पुनर्गठन केलेल्या शेतकºयांचेही कर्ज माफ केल्यामुळे वºहाडातील बहुतांश शेतकºयांना आता त्याचा लाभ मिळणार आहे. अन्यथा वºहाडातील ८० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असते.२००८ - ०९ साली शासनाने कर्जमाफी दिल्यावर अनेक बोगस शेतकºयांना लाभ मिळाला होता. त्यामुळे यावेळी बोगस शेतकºयांना लाभ न मिळता बँकांकडूनही फसवणूक होऊ नये, याकरिता शासनाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.सध्या शासनाच्यावतीने शेतकºयांकडून एक अर्ज भरून घेण्यात येत आहे. यामध्ये शेतकºयाचे नाव, त्याच्याकडे असलेली शेती, त्या शेतीवर कोणत्या बँकेचे किती कर्ज आहे, तसेच बँकेचा खाते क्रमांक व आधार क्रमांक लिहून घेण्यात येत आहे.सदर अर्ज आॅनलाइन करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सदर अर्ज गोळा करून त्याची पडताळणी करण्यात येईल. याबाबत भाजपच्या शेतकरी संवाद यात्रेत संपूर्ण राज्याच्या संयोजनाची भूमिका पार पाडलेले आ. डॉ. संजय कुटे यांनी सांगितले, की २००८ - ०९ साली कर्जमाफी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांसोबतच केवळ शेतीवर अवलंबून नसलेल्या शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता, तसेच त्यावेळी बँकांनीही चुकीची माहिती दिली असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. त्यामुळे यावेळी केवळ पात्र व गरजवंत शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा, याकरिता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.त्याकरिताच शेतकºयांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहे. सदर प्रक्रिया आॅगस्ट महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.आधार कार्डच्या पावतीची सुविधाप्रत्येक शेतकºयाचे बँक खाते आधार लिंक करण्यात येणार असून, केवायसीही करण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांकडे आधार कार्ड नाही. त्या शेतकºयाला आधार कार्ड काढून त्याची पावती जोडावी लागणार आहे. शेतकºयांनी आधार कार्ड काढण्याकरिता दिलेले असल्याची पावती जोडली तरी शेतकºयांचा अर्ज स्वीकारल्या जाणार आहे.कार्यकर्ते देणार शेतकºयांना माहितीशेतकºयांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. शासनाने शेतकºयांना केवळ अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. सदर अर्ज शेतकºयांनी भरून तहसीलदार किंवा संबंधित यंत्रणेकडे द्यायचे आहे. हे अर्ज भरताना शेतकºयांना काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडविण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांनी आपआपल्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना शेतकºयांच्या अडचणी सोडवून त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कर्जाचे पुनर्गठन केले आहे. सदर शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे कर्जमाफीचा लाभ पुनर्गठित शेतकºयांना देण्याची मागणी केली. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्यही केली आहे, तसेच गरजवंत शेतकºयांना लाभ मिळावा, याकरिता थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. यामुळे गरजवंत शेतकºयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही कर्जमाफीचा लाभ लाटता येणार आहे. अशाप्रकारे पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.- आ. डॉ. संजय कुटे, जळगाव जामोद, बुलडाणा.