शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीएम केअर फंडातून बुलडाणा जिल्ह्याला ७५ व्हेंटिलेटर्स, ९ बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 11:02 IST

PM Care Fund News : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना ७५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले असून यापैकी ६६ व्हेंटिलेटर्स सध्या सुरू असल्याची माहिती पाहणीत समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पीएम केअर फंडातून बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना ७५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले असून यापैकी ६६ व्हेंटिलेटर्स सध्या सुरू असल्याची माहिती पाहणीत समोर आली आहे. दरम्यान, ९ व्हेंटिलेटर्स अद्यापही बंद असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. व्हेंटिलेटर्स असलेल्या बेडचीही मागणी वाढत आहे. त्यासाठी रुग्णाला घेऊन नातेवाईकांची जिल्ह्यात धावपळ सुरू सुरू आहे. मात्र व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागल्याचे एकंदरीत चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. गेल्या वर्षी पीएम केअर फंडातून बुलडाणा जिल्ह्याला ७५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले होते. यापैकी ६६ व्हेंटिलेटर्स सध्या कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र ९ व्हेंटीलेटर्स अद्यापही कार्यान्वित झालेेले नाहीत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांना विचारणा केला असता काही तांत्रिक अडचणीमुळे ९ व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र लवकरच त्यादृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सोबतच तालुकानिहाय आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याअंतर्गत तालुकानिहाय यासंदर्भात काही सुविधा उपलब्ध करता येतील का, याचीही चाचपणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही ५९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून ते कार्यान्वित असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पीएम केअर, जिल्हा वार्षिक योजना आणि अन्य स्रोतांकडून उपलब्ध झालेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या ही ९३ असून त्यापैकी प्रत्यक्षात ७८ व्हेंटिलेटर्स सध्या कार्यान्वित असल्याचे सूत्रांनी सांगितले. देऊळगावराजा येथील ट्राॅमा केअर सेंटरमध्येही जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध झालेले दोन व्हेंटिलेटर्स सध्या कार्यान्वित आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल