शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

४0 गावे अंधारात!

By admin | Updated: June 5, 2017 02:31 IST

पाडळी, हतेडी सबस्टेशन बंद.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हाभरात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने ३ जून रोजी हजेरी लावली. विजेचा कडकडाट व सुसाट वार्‍यामुळे अनेक झाडे कोसळून पडली. यातच बुलडाणा तालु क्यातील पाडळी व हतेडी येथील ३३ के.व्ही. सब स्टेशनच्या तारांवर तांत्रिक बिघाड आल्यामुळे मागील २४ तासापासून या दोन्ही सबस्टेशनवर अवलंबून असणारे सुमारे ४0 गावे अंधारात आहेत. कालच्या पावसानंतर बुलडाणा ते पाडळी व देऊळघाट ते हतेडी या मार्गावरील विद्युत तारांवर कोठे फॉल्ट आला आहे, हे शोधण्याचे काम दोन्ही सबस्टेशनचे कर्मचारी करीत आहेत. मात्र, मागील २0 तासांपासून खंडित वीज पुरवठय़ामुळे हजारो लोकांचे हाल होत आहेत.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून बुलडाणा तालुक्यात अनेक ठिकाणी ३३ के.व्ही.चे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, हा उद्देश यामागील असून, पाडळी व हतेडी येथेसुद्धा ३३ के.व्ही.चे सबस्टेशन आहे. अनेक वर्षांपासून या स्टेशनला बुलडाण्याहून देऊळघाटपर्यंत व देऊळघाटपासून एक लाइन पाडळीला व दुसरी लाइन हतेडी सबस्टेशनला जाते. ३ जून रोजी पडलेला पाऊस व वादळी वार्‍यामुळे या लाइनच्या खाबांवरील इन्सुलेटर (चिनी मातीचे वीजरोधक) बर्‍याच ठिकाणी फुटल्यामुळे वीज पुरवठा ३ जूनच्या सायंकाळपासून खंडित झालेला आहे.पाडळी व हतेडी सबस्टेशनवर अवलंबून असणारे ४0 गावे रात्रीपासून अंधारात आहेत. तिकडे पाडळी व हतेडी सबस्टेशनकडून सर्व वायरमन मुख्य ३३ केव्हीच्या लाईनवर फिरवून खांबावरच्या इन्सुलेटर दुरुस्ती करीत आहेत. आजपर्यंत या विविध ठिकाणी ८ इन्सुलेटर खराब अवस्थेत आढळून आले. सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या गावांमध्ये काल सायंकाळपासून वीज नसल्यामुळे मुस्लीम बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

 

पाडळी व हतेडी सबस्टेशन अंतर्गत येणार्‍या गावांच्या मार्गावरील विद्युत लाइन दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय वादळामुळे निकामी झालेल्या खांबावर नवीन इन्सुलेटर लावण्यात येत आहे.-प्रफुल्ल चितोड, वीज अभियंता, पाडळी सबस्टेशन