शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: April 27, 2017 01:53 IST

खरीप हंगामाची तयारी : कृषी विस्तार, पेरणीसाठी जनजागृती करणार!

नीलेश शहाकार - बुलडाणाजिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे. हंगामादरम्यान बी-बियाणे कोणते विकत घ्यावे, माती परीक्षण कसे व कुठे करावे, पेरणी केव्हा करावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंदा कृषी विभागाकडून ३९१ कृषिमित्रांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात २०१७-१८ या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट असून, १०० टक्के पेरणीची उद्दिष्टपूर्ती डोळ्यापुढे ठेवून कृषी विभागाकडून प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. यानुसार खरीप पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना कोठलीच अडचण येऊ नये, म्हणून यंदा काही प्रयोगशील शेतकऱ्यांची कृषिमित्र म्हणून निवड करण्यात आली आहे.दोन गावांमधून एका शेतकऱ्याची कृषिमित्र म्हणून नेमणूक करण्याबाबत खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिल्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सदर शेतकरी मित्रांची निवड ग्रामपंचायतकडून झालेली असून, येत्या खरीप हंगामामध्ये त्यांच्याकडून कृषी विस्ताराचे कार्य करून घेण्यात येणार आहे. कृषी विभागावरील ताण कमी होणारखरीप हंगाम-२०१७ मध्ये प्रथमच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषिमित्रांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या कामांचा कृषी विभागावर पडणारा ताण काही अंशी कमी होण्यास मदत होईल; मात्र खरीप हंगाम-२०१६ मध्ये कृषिमित्र नसल्याने सदर कामे कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्यात आली होती.