शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या ३७ हजार विद्यार्थ्यांची आहे आता शाळेत उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभी बंद असलेल्या जिल्ह्यातील ९ ते १२वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रारंभी अवघी ...

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभी बंद असलेल्या जिल्ह्यातील ९ ते १२वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रारंभी अवघी सात हजारांच्या आसपास असलेली उपस्थिती आता दीड महिन्यांनंतर ३७ हजारांच्या टप्प्यात पोहोचली आहे.

विशेष म्हणजे याकालावधीत एकही विद्यार्थी कोरोनामुळे संक्रमित झालेला नाही, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

प्रारंभी २० हजार पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी संमतिपत्र शिक्षण विभागाला दिले होते. मात्र प्रत्यक्षात सात हजार विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहत होते. त्यानंतर जसजसी कोरोना संसर्गाची भीती कमी झाली तथा याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती झाली तसतसा शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आकडा वाढत असून, वर्तमान स्थितीत तो ३७ हजारांच्या घरात गेला आहे.

महिनाभरात जिल्ह्यात किती विद्यार्थी संक्रमित निघाले?

जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांत एकही विद्यार्थी कोरोनामुळे संक्रमित झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिली. जाणीव जागृती झाल्याने व सुरक्षेचे नियम पाळण्यात येत असल्याने अडचणी आल्या नाहीत.

शाळा सुरू करण्याच्या मोहिमेच्या प्रारंभी सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या केरोना चाचण्या करण्यात आल्या होता. त्यात काही शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रारंभी नऊ शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता टप्प्या टप्प्याने कोरोना संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना करत नववी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.