शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

३३ पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा!

By admin | Updated: June 23, 2016 23:22 IST

नांदुरा येथील शिक्षकांची ३३ पदेरिक्त असल्यामुळे पालक वर्गामध्ये संताप.

किशोर खैरे / नांदुरा(जि. बुलडाणा)नांदुरा पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील मुख्याध्यापक व शिक्षकांची ३३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक बालकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतल्या जात असल्याने पालकांत चिंता व्यक्त होत आहे.शासन निर्णयानुसार, बालकांना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाचा कायदेशीर हक्क आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षणा नसल्यामुळे पालकांचा कल इंग्रजी शाळेकडे वळत असून, मराठी व उर्दू माध्यमाच्या ३३ शिक्षकांच्या जागाच रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी माध्यमांच्या मुख्याध्यापकांची ३ पदे, पदवीधर शिक्षकांची १७ पदे, सहायक अध्यापकांची २ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमाच्या मुख्याध्यापकांची ३ पदे, पदवीधर सहायक शिक्षकाची ८ पदे असे एकूण ११ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मराठी व उर्दू माध्यमांची एकूण ३३ पदे रिक्त असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पडोळ यांनी दिली. दरम्यान, मराठी माध्यमाच्या सहायक अध्यापकाची २ पदे अतिरिक्त असून, उर्दू माध्यमाच्या ३ शिक्षकांची पदेही अतिरिक्त ठरली आहेत. नांदुरा तालुका हा दुष्काळग्रस्त, मागासलेला तालुका आहे. ग्रामीण भागात ११३ शाळांमधून प्राथमिक शिक्षणाची सोय जिल्हा परिषद मार्फत करण्यात आलेली आहे; तसेच इंग्रजी शाळांचे व खासगी शाळांचे प्रस्थ वाढू लागल्याने व त्याची शैक्षणिक फी गरीब शेतकरी व शेतमजूर भरु शकत नसल्याने आर्थिकदृष्ट्या विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांना शिक्षण देतात.