शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी २६ यंत्रणा कार्यरत

By admin | Updated: June 3, 2017 00:45 IST

मोहिमेची अंमलबजावणी तीन टप्प्यांत : ग्रामपंचायत यंत्रणेला सर्वात जास्त उद्दिष्ट

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य २६ यंत्रणा मोहिमेत सहभागी होणार आहेत.झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे दरवर्षी कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी शासन विविध योजनेंतर्गत ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा देते. विविध योजनांच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन देते. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, यावर्षी कोटीचे उद्दिष्ट राज्याचे आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला यंदा ८.५२ लाख वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३.१५ लाख इतके देण्यात आले आहे, तर सामाजिक वनीकरणचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्याला मागील वर्षी तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गंत ३ लाख ५३ हजार ६३३ वृक्ष रोपणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जिवंत आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, सर्वात जास्त उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजार वृक्षाचे देण्यात आले आहे.मोहिमेत सहभागी मुख्य २६ यंत्रणाबुलडाणा जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीमध्ये प्रशासनाच्या मुख्य २५ यंत्रणा सहभागी होणार आहेत. त्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार तथा वस्त्रोद्योग विभाग, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक, महावितरण, अन्न औषध प्रशासनाचे दवाखाने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, परिवहन विभागाचे राज्य परिवहन विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग, विधी न्याय विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे सिंचन विभाग व पाटबंधारे तसेच कौशल्य विकास विभाग, महसूल विभाग, बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, केंद्र सरकारचे बीएसएनएल व जिल्हा डाक कार्यालय, क्रीडा विभाग तसेच ग्रामविकास विभाग या सर्व शासकीय विभागांना एकूण ८ लाख ५२ हजार वृक्ष रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.मोहिमेची अंमलबजावणी तीन टप्प्यांतराज्यात पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कालावधी १ ते ७ जुलै २०१७ राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१८ राहणार आहे, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१९ राहणार आहे.