शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

२.५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:05 IST

लोणार  : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाऊस गायब आठ दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकटशेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार  : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोणार तालुक्यात कृषी हंगाम हा शेतकर्‍यांची अर्थ वाहिनी आहे. त्यामुळे या हंगामावर शेतकर्‍यांची भिस्त असते. लोणार तालुक्यात सुमारे ३६ हजार शेतकरी आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच ६ आणि ७ जून रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहीत धरून अनेक शेतकर्‍यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. जून महिन्यात झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस अद्यापही झाला नाही. १५ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी तालुक्यात शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढू लागली आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी संकटात आहेत. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊसच होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत.  सध्या ही पिके तग धरून आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावू शकते. 

शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा२0१७ च्या खरीप पिकासाठी एकूण ५४ हजार ५00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीच्या उद्दिष्टापैकी यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टरने वाढ झाली आहे. नियोजनानुसार ज्वारी ५00 हेक्टर, तूर १0000 हेक्टर, मूग २000 हेक्टर, उडीद १५00 हेक्टर, सोयाबीन ३८000 हेक्टर, कपाशी २000 हेक्टर, इतर पिके ५00  हेक्टरील पिकांना सध्या पावसाची गरज  आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.