शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

२0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाने जलक्रांती!

By admin | Updated: June 22, 2016 00:08 IST

नदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सादर : सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, लोणार तालुक्याला लाभ.

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)शाश्‍वत सिंचनावर भर देऊन शेतीची स्थिती सुधारण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवारांतर्गत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार व चिखली या चार तालुक्यातील २0 महत्त्वाच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास या चारही तालुक्यातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, यातील ५ नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता मिळाली असून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.वाढते औद्योगिकरण, शहरीकरणासह इतर अनेक कारणांमुळे नद्या मृत होत चालल्या आहेत. पर्यायाने सिंचन क्षमतेवर परिणाम होत असून बारमाही पाणी असणार्‍या नदीकाठच्या विहिरीदेखील कोरड्या पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याची गंभीरतेने दखल घेऊन राज्य सरकारने शेतीसाठी शाश्‍वत सिंचन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणार्‍या जलसंधारणाच्या विविध कामांमध्ये नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत देऊळगावराजा तालुक्यातील आमना नदी, जांभळीचा नाला, मुंजा नदी, वाघुळजा नदी, जीवरेखा नदी, वटसावित्री नदी, धारागिरी नदी, रोहणा नदी व खडकी नदी. सिंदखेडराजा तालुक्यातील पाताळगंगा नदी, खटकळी नदी, तरोळी नदी, विद्रुपा नदी, शिपला नदी, मांगवाडा नदी, मुकवाडा नदी, पापळ ओढा, तर चिखली तालुक्यातील सावित्री नदी व लोणार तालुक्यातील नारळा नदी या २0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासनाकडे सादर केला आहे. दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५ नद्यांसाठी १ कोटी ८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याने यातून खडकपूर्णा नदी व संत चोखासागर जलाशयाला जोडणार्‍या जांभळी नाला (आमना नदी) २९ लाख ५४ हजार, मुंजा नदी १४ लाख १ हजार, वाघूळजा नदी ३४ लाख ९६ हजार, जीवरेखा नदी ३९ लाख ८३ हजार, वटसावित्री नदी २८ लाख २८ हजार असे एकूण ५ नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी प्रयोगिक तत्त्वावर १ कोटी ८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी मिळाल्याने पावसाळय़ाचे दिवस पाहता त्यांचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार उर्वरित सर्व १५ नद्यांच्या पुनरुज्जीवनास मंजुरात व निधी मिळाल्यास लाभ क्षेत्रातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सिंचनाखाली येणार असून शेती सुजलाम्-सुफलाम् होण्यासह पाणीटंचाईवरही मात होण्यास मोठी मदत होणार आहे.