मोताळा : बोराखेडी ग्रामपंचायतअंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यातआलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई अशी मागणीबोराखेडी ग्रा. पं. चे उपसरपंच शे. साबीर शे. बशीर यांनी गट विकासअधिकाऱ्याकडे केली आहे. बोराखेडी येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये बोराखेडी ग्रामपंचायतीने १४व्या वित्त अंतर्गत अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप लाईनचे काम केले आहे.सदर काम कोणत्याही ग्रा. पं. सदस्यांना विश्वासात न घेता करण्यात आलेअसून टेंडर न काढता केले आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पाईप लाईनबऱ्याच ठिकाणी फुटली असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. फुटलेल्या पाईपलाईनमधून ग्रामस्थांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचेआरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितकामाची चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य कमिटीला कोणतेही बिल अदा करून नये.बोराखेडी सरपंच यांनी सदर कामात जुनी पाईप लाईन टाकून नवीन दाखवत बिलकाढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईकरावी असे तक्रारीच्या शेवटी नमूद आहे. तक्रारीवर शे. साबीर शे. बशीरउपसरपंच बोराखेडी यांची स्वाक्षरी असून, तक्रारीच्या प्रतिलिपीजिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा यांना देण्यात आल्याआहेत.(तालुका प्रतिनिधी)
१४ व्या वित्त अंतर्गत निकृष्ट कामे!
By admin | Updated: April 7, 2017 15:11 IST