शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१३८ गावांना पाणीटंचाईची झळ!

By admin | Updated: June 25, 2016 00:55 IST

१0 टक्के पावसानंतरही १५२ टँकर्स सुरू: प्रकल्पांनी गाठला तळ!

विवेक चांदूरकर / बुलडाणा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी मुबलक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत. पाणीटंचाईची धग अजूनही कायम असून, अजूनही १३८ गावांमध्ये १५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत तीन वर्षांपासून अल्प प्रमाणात पाऊस होत असल्याने यावर्षी जलप्रकल्पांनी तळ गाठला. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. हवामान खात्याने यावर्षी लवकर व मुबलक प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे जून महिन्यात पाणीटंचाईचे संकट दूर होईल, अशी अपेक्षा होती; मात्र जिल्ह्यात २४ जूनपर्यंत केवळ ८६.00 मिमी पाऊस असून, ही टक्केवारी ९.५९ आहे. दहा टक्के पाऊस पडल्यावरही प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली नसून, पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यात अकरा तालुक्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच जिल्ह्यात ५६९ गावांमध्ये ७७६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी ४८ गावांमध्ये तात्पुरत्या पुरक नळ योजना सुरू करण्यात आल्या. यापैकी १९ गावातील १९ योजना मंजूर असून, १६ गावातील योजना पूर्ण झाल्या आहेत. एका गावातील योजना प्रगतीत आहेत. जिल्ह्यात मेहकर तालुक्यात सर्वात जास्त २६ गावांमध्ये २८ टँकर सुरू आहेत तर बुलडाणा तालुक्यात २४ गावांमध्ये ३३ टँकर, तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील २४ गावांमध्ये २९ टँकर, मोताळा तालुक्यात ७ गावात ७ तर खामगाव तालुक्यात सहा गावात सहा टँकर सुरू आहेत. जून महिना संपत आला तरी चांगला पाऊस झाला नसल्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर हाहाकार माजणार असून, हे संकट अधिकच गडद होणार आहे. शेतकर्‍यांसह सर्वच जण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.