शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

१३ शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरचे पितळी नौझल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

चिखली : शेतात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी देऊळगाव घुबे शिवारातील १३ शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरचे पितळी नाेझल एका रात्रीतून चोरून ...

चिखली : शेतात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी देऊळगाव घुबे शिवारातील १३ शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरचे पितळी नाेझल एका रात्रीतून चोरून नेले आहेत. ही घटना १३ सप्टेंबर रात्री घडली आहे.

अंढेरा पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या देऊळगाव घुबे येथील बागवणी शिवारात असलेल्या गट नं.५९८ मधील शेतकरी भास्कर घुबे, विजय घुबे, अशोक कोकाटे, सुरेश घुबे, मंदा घुबे, मनोहर कोकाटे, उत्तम घुबे, रामेश्वर गोरे, ज्ञानेश्वर गोरे, नदंकिशोर गोरे, गजानन घुबे या शेतकऱ्यांनी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर पाइप टाकलेले होते. १३ सप्टेंबर रोजी शेतातील कामे आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे शेतकरी सांयकाळी घरी परतले. शेतात कोणीच नसल्याचे हेरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १३ शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरसाठी वापरले जाणारे सर्व पितळी नौझल लंपास केले आहे. १४ सप्टेंबरला शेतकरी सकाळी पुन्हा शेतात गेले असता ही बाब उघडकीस आली. यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार पंजाबराव साखरे हे करीत आहेत.