शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांकडून जिल्ह्यात १२.३० कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST

बुलडाणा : जिल्ह्यात कृषक व अकृषक क्षेत्रात १२२ परवानाधारक सावकारांनी १२ कोटी ३० लाख १४ हजार ९१९ रुपयांचे ...

बुलडाणा : जिल्ह्यात कृषक व अकृषक क्षेत्रात १२२ परवानाधारक सावकारांनी १२ कोटी ३० लाख १४ हजार ९१९ रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील १४ हजार २६१ नागरिकांना हा कर्जपुरवठा या सावकारांनी केला आहे. यात प्राुख्याने ३६ शेतकऱ्यांना ५ लाख ६६ हजार रुपयांचे कृषी कर्ज, तर उर्वरित कर्ज हे बिगर कृषी क्षेत्रात देण्यात आले आहे. त्याचा आकडा १२ कोटी २४ लाख ४८ हजार ९१९ रुपये आहे. १४ हजार २२५ जणांनी ते घेतेल आहे. विशेष म्हणजे यापैकी ११ कोटी ८४ लाख ४६ हजार ६१९ रुपयांचे कर्ज हे तारणावर दिल्या गेले आहे, तर २१८ जणांना ४५ लाख ६८ हजार ३०० रुपयांचे कर्ज हे बिगर तारण दिल्या गेले आहे.

दुसरीकडे गेल्या वर्षी ५५ शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात आले असून, सावकाराच्या ताब्यात असलेली ५९ हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांना परत करण्यात आली होती. अवैध सावकारीच्या जिल्ह्यात ५९६ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ५११ तक्रारीमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. यापैकी अवैध सावकारी झाल्याचे ७५ प्रकरणांत सिद्ध झाले असून, अन्य प्रकरणांत कारवाई होतेय.

अनधिकृत सावकारी

अवैध सावकारीच्या जिल्ह्यात नवा अधिनियम लागू झाल्यापासून ५९६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२० नंतर २७ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी जवळपास ४८ प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

चार प्रकरणे पुनर्निरीक्षणासाठी

अवैध सावकारीशी संबंधित चार प्रकरणे पुनर्निरीक्षणासाठी अमरावती व तेथून पुणे येथे पाठविण्यात आली आहे तर फेरसुनावणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तीन प्रकरणं आली आहेत. १२ प्रकरणांत अपील दाखल करण्यात आले असून, दोन प्रकरणांतील आरोपी मृत झाल्याने त्यात गुन्हे दाखल नाहीत.

अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी

अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला ९ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८टक्के व्याजदर आकारला जातो.

घेतलेले कर्ज

शेगाव तालुक्यात ३६ शेतकऱ्यांनी सावकारांकडून ५ लाख ६६ हजार रुपये कर्ज घेतले आहे, तर अकृषक क्षेत्रात एकट्या शेगाव तालुक्यातल १,४४७ जणांनी एक कोटी पाच लाख ६४ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेतले आहे. खामगाव तालुक्यात ९,४०० जणांनी अकृषक क्षेत्रासाठी ८ कोटी ३२ लाख ६२ हजार ८५० रुपये कर्ज घेतलेले आहे. मेहकर तालुक्यातही १ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांचे १,७१० जणांनी कर्ज घेतले आहे. नांदुऱ्यातही आकडा मोठा आहे.